बॅक ऑफ इंडिया संघटने कडुन जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत
वाकडपाडा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना बॅक ऑफ इंडिया अधिकारी संघटना मुंबई व गोवा यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
गेल्या 29 वर्षा पासून हे कार्य अधिकारी संघटना करत असुन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्या साठी मोलाचा हातभार लावला जात आहे.
बॅक ऑफ इंडिया अधिकारी संघटना व शाळेचे नात घट्ट असुन आम्ही दरवर्षी आपली वाट पाहत असतो असे मत प्रदीप वाघ यांनी व्यक्त केले व आलेल्या अधिकारी वर्गाचे त्यांनी स्वागत केले.
यावेळी बोलताना संघटनेचे खजिनदार विकास मोरे यांनी सांगितले की या मुलांना भेटल्यावर आम्हाला वेगळे समाधान व आनंद मिळतो म्हणून आम्ही दरवर्षी न चुकता येत असतो उपाध्यक्ष विक्रम खराडे यांनी सांगितले की मुलांनी शैक्षणिक प्रगती करावी आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत.
अधिकारी संघटना दरवर्षी मुंलाना शैक्षणिक साहित्य वाटप करते तसेच दिवाळीला मिठाई व फटाके देखील विद्यार्थ्यांना भेट दिले जातात.
या कार्यक्रमा साठी अधिकारी संघटने अध्यक्ष अल्टन सल्डान,
उपाध्यक्ष विक्रम खराडे, खजिनदार विकास मोरे, गौरव कदम, सदस्य सुबोध गायकवाड, निलेश ठोमरे, तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रदीप वाघ, उपसरपंच नंदकुमार वाघ, पोलिस पाटील विठ्ठल गोडे, माजी सरपंच संजय वाघ, पवार सर, मुख्याध्यापक सुहास दिनकर, शिक्षक शतानंदभेरे ,निलेश
गांगवे,शाम फसाळे,हर्षदा खादे इत्यादी उपस्थित होते.



