महाराष्ट्र

इंदापूर सहकार निबंधक कार्यालयातील नियमबाह्य एसी. काढला.किरण भांगे,सलीम शेख यांच्या प्रयत्नाला यश

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

इंदापूर तालुका सहकारी संस्था कार्यालयात सहाय्यक निबंधक यांनी नियमबाह्यरित्या एअर कंडिशनर बसवला होता.सामाजिक कार्यकर्ते किरण भांगे,सलीम शेख यांच्या यशस्वी पाठपुराव्यानंतर अखेर हा एसी. काढण्यात आला.

शा.नि. क्र.शाकाजा-1022/प्र. क्र.13/22 मंत्रालय,मुंबई यांचे शासन निर्णयान्वये 7 व्या वेतन संरचनेनुसार ज्या अधिकाऱ्यांचा वेतन स्तर S-30 अर्थात 1,44,200 ते 2,18,000 पेक्षा कमी आहे,अशा अधिकाऱ्यांच्या दालनात एसी. बसविता येत नाही.तत्कालीन सहाय्यक निबंधक गावडे यांनी शासन निर्णयाचा अनादर करून एसी.च्या देयकांचा खर्च हा जनतेने शासनाला प्रदान केलेल्या करातून केला जात असल्याचे क्रांतीमित्र सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण भांगे व सलीम शेख यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते.

“शासकीय अधिकारी हे लोकसेवक असून जनतेचा पैसा अनावश्यकरीत्या खर्च करत आहेत,अशा बाबीकडे सामाजिक कार्यकर्ते,माहिती अधिकार कार्यकर्ते,पत्रकार व सुज्ञ नागरिकांनी सतर्कतेने लक्ष द्यावे.” असे आवाहन सलीम शेख यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button