महाराष्ट्र

मुंबई पोलिसांचा पालघर तारापूर मधील कारखान्यावर छापा…लाखो रुपयांचा मेफोड्रेनचा साठा केला जप्त.

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

मुंबई पोलिसांनी पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसीतील एका कारखान्यावर छापा टाकून लाखो रुपयांचा मेफोड्रेन (एमडी) या अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे.याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

मुंबईतील अंधेरी एमआयडीसी परिसरात 07 जून 2025 रोजी अंधेरी पोलिसांनी फरहान गुलजार खान या संशयित कारचालकाला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्याकडून 2 लाख 80हजार रुपये किंमतीचे 71 ग्रॅम मेफोड्रेन (एमडी) साठा जप्त करण्यात आला होता. फरहान खान हा मुंबई पोलिसांचा अभिलेखावरील एक सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यात एकूण 13 गुन्हे दाखल आहेत. अंमली पदार्थाबाबत त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी पालघर येथील प्रतीक सुदर्शन जाधव याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडून 08 लाख 60 हजार रुपये किंमतीचे 215 ग्रॅम मेफोड्रेन जप्त करून अटक करण्यात आले आहे.

पोलिसांनी दोन्ही आरोपींची कसून चौकशी केली त्याचसोबत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मेफोड्रेन या अंमली पदार्थांचे बेकायदा उत्पादन करून त्याचा पुरवठा करणारा बोईसर येथील विजय खटके याला ताब्यात घेतले.आरोपी विजय खटके हा रसायनशास्त्र पदवीधर असून तो तारापूर एमआयडीसी येथील “प्रोकेम लॅब फार्मास्युटिकल” या कंपनीत मेफोड्रेन हा अंमली पदार्थ तयार करीत असल्याचा पोलिसांचा आरोप असून त्याच्याकडून 11 लाख 20 हजार रुपये किंमतीचे 280 ग्रॅम मेफोड्रेन व कच्चा माल जप्त करण्यात आला आहे.

मेफोड्रेनचे बेकायदा उत्पादन आणि विक्रीमध्ये सामील असलेल्या तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून एकूण 566 ग्रॅम वजन असलेले 22 लाख 66 हजार किंमतीचे मेफोड्रेन, दोन कार आणि सहा मोबाईल असा 36 लाख 57 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.या तिन्ही आरोपींना अंधेरी न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी अंधेरी पोलिस विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त शशिकांत भोसले यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक महेश गुरव हे अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button