महाराष्ट्र

थकीत मालमत्ता करावरील शास्ती माफ करून कर वसुलीसाठी प्रोत्साहनात्मक “अभय योजना” सुरू करण्याबाबत राष्ट्रवादी श प ने दिले अकलूज नगरपरिषदेला निवेदन…

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) गटाचे माळशिरस विधानसभा कार्याध्यक्ष मोहसीन शेख यांनी दिले…

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

संदर्भ : शासन निर्णय क्र:- एमयुएम-२०२५/प्र.क्र.७०/नवि-१७

उपरोक्त शासन निर्णयाच्या आधारे अकलूज नगरपरिषद क्षेत्रामध्ये अनेकवेळा मालमत्ता कराची थकबाकीची रक्कम जास्त असणे,मालमत्ता धारकांची आर्थिक अडचण असणे या व इतर कारणांमुळे मालमत्ता कराचा भरणा करण्यात येत नाही.महाराष्ट्र नगरपरिषदा,नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम,१९६५ चे कलम १५० (अ) (१) नुसार बिलाच्या न भरलेल्या रकमेवर संबंधित नगरपरिषद / नगरपंचायत यांचेकडून दरमाह २ टक्के शास्ती लावण्याचे प्रावधान आहे.

यामुळे मालमत्ता धारकांच्या एकूण थकबाकी मध्ये वाढ होऊन याचा विपरीत परिणाम कर वसुलीवर होतो.यावर उपाययोजना म्हणून नगरपरिषदा क्षेत्रातील थकीत मालमत्ता करावरील शास्ती माफ करून कर वसूल करण्यासाठी प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने “अभय योजना” लागू करण्याबाबत शासन स्तरावर विचार करण्यात आला आहे…

महाराष्ट्र शासन निर्णयाप्रमाणे या “अभय योजना” ची तूर्तास अंमलबजावणी झाल्यास अकलूज नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.तसेच अकलूज नगरपरिषद स्थापनेपासून प्रलंबित सर्व थकित मालमत्ता कर आकारणी करण्यास ही नागरिकांचे अपेक्षित असे सहकार्य होईल,यात शंकाच नाही.

नगरपरिषद प्रशासनाने सामाजिक महत्त्वाकांक्षा ठेवून कोणतेही निर्बंध न लादता अभय योजने बाबत धोरणात्मक निर्णय घ्यावे अन्यथा नाईलाजाने आम्ही नगरपरिषद कार्यालयासमोर बेमुदत ठिय्य् आंदोलन करू याची प्रशासनाने नोंद घ्यावी,असे निवेदन माळशिरस विधानसभा,राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) गटाचे कार्याध्यक्ष मोहसीन शेख यांनी दिले…

या वेळी समीर काझी,फारुक शेख यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) गटाचे बहुसंख्य सदस्य उपस्थित होते…

सोबत – महाराष्ट्र शा.निर्णय व अध्यादेश प्रत जोडली आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button