पुढील आठवड्यात मिनी विधानसभेच्या निवडणुकीचा “बिगुल” वाजण्याची दाट शक्यता…

🎯 अकलूज नगर परिषदेची “पहिली महिला नगराध्यक्षा” कोण होणार या कडे मात्र सबंध महाराष्ट्राचे लक्ष…
आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
मित्रांनो,
सबंध महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी महिन्याच्या अखेर पर्यंत पार पाडा,असा “सुप्रीम” आदेश असून त्या अनुषंगाने पुढील आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीचे “बिगुल” वाजण्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली असून निवडणूक आयोग,महाराष्ट्र सरकार आणि पोलिस प्रशासन कामाला लागलेले दिसत आहे…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका महाराष्ट्रामध्ये जवळ जवळ सात आठ वर्षांनी होत आहेत,या दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंतर्गत येणाऱ्या महानगर पालिका,जिल्हा परिषदा,पंचायत समित्या आणि नगर परिषदेच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार असल्याची माहिती हि सुत्रांनी दिली…
काहीं ठिकाणच्या राजकीय परिस्थितीचा विचार केला तर जिथे ग्रामपंचायती होत्या तिथे काही ठिकाणी नगर परिषदेच्या रूपाने आता आपल्याला निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे,2021 पर्यंत अकलूज सारख्या आशिया खंडात अग्रेसर असणाऱ्या ग्रामपंचायतीचे नगर परिषदे मध्ये रूपांतर करण्यात आले…
या मध्ये सबंध अकलूजकरांना काहीं काळ उपोषण,आंदोलन देखील करावे लागले आणि सरते शेवटी 99 वर्षाची अकलूज ग्रामपंचायत विसर्जन होऊन “अकलूज नगर परिषद अकलूज” झाली असून महत्त्वाची बाब म्हणजे अकलूज नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडती मध्ये अनुसूचित जाती (SC) महिला साठी आरक्षण जाहीर झाले असल्याने अकलूज नगर परिषदेची पहिली महिला “नगराध्यक्षा” कोण होणार… या कडे हि सर्वांचे लक्ष लागले आहे…
तमाम अकलूजकर मतदार बंधू आणि भगिनीं हे पहिल्यांदाच नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत आणि हि निवडणूक प्रामुख्याने पक्षीय राजकारणाच्या अनुषंगाने होत असते आणि ती पक्षीयच राजकारणाने व्हावी असे जनतेचे आणि राजकीय जाणकारांचे मत आहे…
तत्कालीन अकलूज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नेहमीच जयसिंह मोहिते पाटील यांची “कमांड” दिसून येत होती,परंतु या वेळी माळशिरस तालुक्या सह अकलूज येथील राजकीय परिस्थिती बदलली असल्याने त्याचे पडसाद सुद्धा उमटताना दिसून येत आहेत…
सध्याच्या घडीला अकलूज नगर परिषद निवडणुकीसाठी अनेक राजकीय “प्रकांड पंडित” आपले अंदाज व्यक्त करण्यात मग्न असल्याने “जर तर” ची राजकीय भाषा ऐकण्यास मिळत आहे,या मुळे सबंध अकलूजकर राजकीय दृष्ट्या “सैरभैर” झालेले पहायला मिळत आहेत…
अकलूज ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सत्ताधारी “शिवरत्न” गटाला “प्रतापगड” येथील गटाने नेहमीच आव्हान दिलेले आपल्याला पहायला मिळाले असून या मध्ये आता भाजपाचे माजी आमदार राम सातपुते यांनी सुद्धा उडी घेतल्याचे पहायला मिळत आहे…
माजी आमदार राम सातपुते यांच्या हातातली “बंदूक” मात्र माने पाटील परिवाराच्या खांद्यावर असणार असल्याचे चित्र या आठवड्यात सबंध महाराष्ट्राने सोशल मीडिया द्वारे पाहिले असल्याने अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीची रंगत आणखी वाढलेली दिसत आहे…
त्या साठी आपण थोडे वेट अँड वॉच करण्यात काय हरकत आहे,असे मला तरी वाटत आहे,आपली हक्काच्या अकलूज नगर परिषदेची निवडणूक हि पार पडणारच आहे,परंतु आपल्या प्रभागातील “नगरसेवक” हा कसा असावा…? याची खूणगाठ देखील आपल्यातील काहींनी बांधून ठेवली असावी हे मात्र तितकेच खरे…
देशातील आणि आशिया खंडातील एक अग्रगण्य ग्रामपंचायत म्हणून अकलूजने ओळख निर्माण केली होती.अनेक वर्षे सहकार,शिक्षण आणि कृषी क्षेत्रातील संस्थांच्या माध्यमातून या गावाने राज्याला दिशा दिली असून आता ९९ वर्षांच्या ग्रामपंचायतीचा इतिहास समाप्त होऊन अकलूज नगर परिषद अस्तित्वात आली आहे.त्यामुळे हि पहिली निवडणूक केवळ राजकीय लढाई नसून,अकलूजच्या भविष्याची “दिशा” ठरवणारी ठरणार आहे.विकासाचा हा “अकलूज पॅटर्न” नगर परिषदेच्या माध्यमातून पुढे कसा नेला जातो,यावर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे…
“सुप्रीम” कोर्टाच्या आदेशानुसार निवडणूक आयोग आता युद्धपातळीवर कामाला लागला आहे.चालू आठवड्यात निवडणुकीचा पहिला टप्पा म्हणजेच “आचारसंहिता” लागणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत…
तसेच प्रशासकीय कामे ही वेगाने पूर्ण होत असल्याचे दिसत आहे,अशा सर्व घडामोडींवर टाईम्स 9 न्यूजच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत सविस्तर माहिती पोहोचवत राहणार आहोत…



