पणव महासंचालक केशव घोडके यांनी माळीनगर(श्रीहरीनगर) येथील नागरिकांची घेतली भेट क्रॉसिंग कट पॉइंट मागणीची सकारात्मक चर्चा
प्रतिनिधी… रियाज मुलाणी
मो.9921500780
माळीनगर: माळशिरस तालुक्यातील माळीनगर या गावांमधून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग गेल्या असल्याने तेथील स्थानिक नागरिकांना ये जा करण्याकरता क्रॉसिंग कट पॉईंट नसल्याने ग्रामस्थांनी ०७/१०/२०२४ रोजी साखळी उपोषण सुरू केले होते या उपोषणाची दखल घेत प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग कार्यालय पंढरपूर यांनी तोंडी व लेखी स्वरूपामध्ये येथील पाहणी अहवाल पूर्ण करून नागरिकान कडून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे संबंधित ठिकाणी अंडर पासिंग रोड साठी समर्थता दर्शवली होती
तसेच या ठिकाणचा प्रस्ताव वरील कार्यालयाला पाठवू काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. याच अनुषंगाने आज दि ०१/०१/२०२५ पणव महासंचालक केशव घोडके यांनी माळीनगर (श्रीहरीनगर)या ठिकाणी ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन त्यांची प्रत्यक्षात भेट घेऊन त्यांच्याशी क्रॉसिंग कट पॉइंट व रस्त्यावरचे पथदिवे सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा केली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य अभिजीत वजाळे, सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब रोकडे, रिंकू राऊत, प्रशांतभाऊ ताटे देशमुख उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा माळशिरस तालुका व स्थानिक नागरिक उपस्थित होते.यावेळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान देखील करण्यात आला