सयाजीराजे मित्र मंडळाच्या दहा शाखेंच थाटामाटात उदघाटन…
🎯 अकलूजच्या शेकडो युवकांनी दिली “सयाजीराजे तुम आगे बढो” ची साद…
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी दिलेला ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या मुलमंत्राची पुन्हा एकदा प्रचिती आणत “जाणते राजे” जयसिंह मोहिते पाटील यांचे नातू आणि अकलूज चे माजी सरपंच संग्रामसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव राजे सयाजी यांनी अकलूज शहरात युवकांचे जाळे विणले…
सयाजी राजे मोहीते पाटील यांच्या रूपाने मोहिते पाटील घराण्याच्या चौथ्या पिढीने समाजकारण आणि राजकारणामध्ये “शानदार” प्रवेश करत विरोधकांना एक प्रकारे इशाराच दिला असुन या मुळे अकलूजच्या युवा वर्गात नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र पहायला मिळाले…
काल सयाजीराजे मोहिते पाटील यांनी जवळ जवळ 10 मित्र मंडळाच्या शाखांचे उद्घाटन केले,या मध्ये अकलूज येथील आंबेडकर नगर,बागवान गल्ली,काझी गल्ली,कर्मवीर चौक,नागोबा कट्टा,रामायण चौक येथील युवकांचा जल्लोष पाहण्या सारखा होता…
रामायण चौक येथील शाखेच्या उदघाटने नंतर राजे सयाजी यांनी उपस्थित असलेल्या शेकडो युवकां समोर आपले छोटे खानी भाषण करत सबंध उपस्थितांची मने जिंकली,या वेळी व्यासपिठावर अकलूज येथे विविध 10 शाखेंच्या अध्यक्षांचा सयाजी राजे यांच्या हस्ते हार व फेटा बांधून सत्कार करण्यात आला…