शहर
माळीनगर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी गणेश करडे तर सचिव पदी गोपाळ लावंड यांची निवड
प्रतिनिधी… रियाज मुलाणी
9921500780
माळीनगर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पत्रकार गणेश करडे सर यांची तर पत्रकार श्री.गोपाळ लावंड यांची सेक्रेटरीपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. दि. २७ रोजी माळीनगर येथील कारखाना गेस्ट हाऊस येथे झालेल्या बैठकीत यानिवडी संपन्न झाल्या.
या खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या बैठकीनंतर पत्रकार संघाचे मार्गदर्शक मिलिंद गिरमे यांच्या हस्ते विद्यमान अध्यक्ष गणेश करडे आणि सेक्रेटरी गोपाळ लावंड यांचा सत्कार करून अभिनंदन केले.
यावेळी माळीनगर पत्रकार संघाचे माजी संस्थापक अध्यक्ष व मार्गदर्शक मिलिंद गिरमे,माजी अध्यक्ष.प्रदीप बोरावके, माजी सेक्रेटरी श्री. रितेश पांढरे आणि सदस्य उपस्थित होते…