“रुद्रा कलेक्शन” चे उद्घाटन सयाजीराजे मोहिते यांच्या हस्ते पार पडले…
आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
अकलूज येथील सुप्रसिद्ध “रुद्रा पान” चे सर्वेसर्वा अशपाकभाई बागवान यांनी ग्राहकांच्या पसंतीचे “रुद्रा कलेक्शन” सुरु केले असुन या फर्म चे उद्घाटन मोहिते पाटील यांच्या चौथ्या पिढीतील “युवा नेतृत्व” सयाजीराजे मोहिते पाटील यांनी मोठ्या थाटामाटात केले…
अशपाक भाई यांच्या सदरच्या “रुद्रा कलेक्शन” मध्ये सुवासिक अशा अत्तर,बॉडी स्प्रे,डिओड्रंट तसेच विविध कंपनीच्या पावडर आणि कस्टम प्रणालीतून खरेदी केलेली स्मार्ट वॉच मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली…
“रुद्रा पान” च्या रौप्य महोत्सवी वाटचाली नंतर “रुद्रा कलेक्शन” मध्ये पदार्पण केलेल्या अशपाकभाई यांना शुभेच्छा देण्यासाठी प्रदीप (मामा) जगदाळे,इस्माईलभाई मोहोळकर प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक हाजी जहांगीर शेठ चौधरी,उमेश (बापु) तोरसकर,राजाभाऊ बंडगर,विजय रुपनवर,राजू मोहोळकर,टाइम्स 9 चे अकलूज प्रतिनिधी आमीर मोहोळकर यांनी उपस्थिती दर्शविली होती…
या वेळी अशपाकभाई आणि अम्मूभाई बागवान यांच्या मित्र मंडळी सह जुनेद आणि अनीस बागवान यांचे हि मित्र मंडळी यांच्या सह सोलापूर,तुळजापूर (सिंदफळ) येथील पाहुणे रावळे आवर्जून उपस्थित होते…