सफाळे पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांनी केला धावपटू सागर कोरे यांचा सत्कार

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640
पालघर जिल्ह्यातील सफाळे पूर्व तांदुळवाडी येथे राहणारा सागर कोरे या तरुणाने लडाख मॅरेथॉन ही स्पर्धा दोन तास आणि एक मिनिटात पूर्ण केली आहे.
सागर कोरे या तरुणाच्या या यशामुळे संपूर्ण पालघर जिल्ह्यात त्याचे कौतुक केले जात आहे.

सागर कोरे हा सफाळे पूर्व तांदुळवाडी गावचा रहिवासी असून त्याला लहानपणापासून धावणे या खेळाची खूप आवड होती . त्यांनी धावणे या आपल्या खेळाला छंद बनून आज जगात सर्वाधिक कठीण समजली जाणारी लडाख मॅरेथॉन स्पर्धा दोन तास आणि एक मिनिटात पूर्ण करून यश संपादन केले आहे यामुळे सागर कोरे या तरुणाचे संपूर्ण पालघर जिल्ह्यात कौतुक केले जात असून त्याला पुढील यश संपादन करण्यासाठी त्याला शुभेच्छा देऊन सफाळे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांनी त्यांच्या घरी जाऊन त्याचा श्रीफळ आणि शाल देऊन सत्कार केला .



