शहर

डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था वैतरणा स्टेशन कमिटीच्या वतीने प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी श्रमदान करून काढले खड्यांमधील पाणी

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640

वैतरणा स्टेशन परिसरातील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे प्रवाशांची मोठ्ठी गैरसोय होत आहे.वैतरणा परिसरातील गावं पाड्यांमधील हजारो नागरिक दररोज ह्याच रस्त्याने प्रवास करत असतात.मात्र ह्या मुख्य रस्त्यांवर चालणाऱ्या वाहनांमुळे मोठमोठे खड्डे पडत असल्याने त्या खड्यांमध्ये साचणाऱ्या पाण्यामुळे रेल्वे स्थानकात येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची तसेच ह्या रस्त्याने प्रवास करणाऱ्या असंख्य नागरिकांची मोठी गैरसोय निर्माण होते.ही गैरसोय लक्षात घेऊन डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या वतीने सोमवार दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजी श्रमदान मोहीम हाती घेत खड्यांमधील पाणी काढून प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न केला.

ह्या श्रमदाना साठी संस्थेचे उपाध्यक्ष सतिश धर्मा गावड सहसल्लागार सखाराम पाटील, DVPSS वैतरणा स्टेशन कमिटी सचिव गिरिधर टोकरे,वैतरणा. स्थानक रिक्षा चालक तसेच प्रवासी वर्गाने सहभाग घेऊन श्रमदान केले.वैतरणा स्टेशन परिसरातील रस्ते व्यवस्था सुधारण्यासाठी मागच्या अनेक वर्षांपासून संस्थेच्या वतीने संबंधित विभाग पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात आहे.शिवाय त्या भागातील रस्त्यांची नियमित दुरुस्ती करण्याची मागणी देखील केली जात आहे मात्र पालिका प्रशासन ह्या रस्त्यांची योग्य प्रकारे दुरुस्ती देखील न करता रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याची आश्वासने देत असून इथल्या रस्त्यांवर जाणीवूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.

वैतरणा विभागातील १०-१२ गावांमधील नागरिकांसाठी रेल्वे हा एकमेव असा सोईचा पर्याय आहे आपल्या उदरनिर्वाह करीता शिक्षणासाठी तसेच प्रत्येक आवश्यक गोष्टींसाठी नागरिकांना ह्याच स्थानकातून प्रवास करावा लागतो त्यामुळे निश्चितच स्टेशन परिसरातील रस्त्यांवर चालत प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या ही सर्वाधिक असून प्रथमत तिथले रस्ते बनवणे गरजेचे आहे त्यामुळे वसई विरार महानगरपालिका आयुक्त पवार यांनी स्वत पाहणी करून इथल्या रस्त्यांची अवस्था सुधारणे गरजेचे आहे अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button