पालघर जिल्ह्यातील डहाणू कासा या ठिकाणी एकाच दिवशी खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते 40 गटांना 110 लक्ष रुपये रक्कमेचे वाटप

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व 4 बँक शाखायांच्या संयुक्त विध्यमाने डहाणू तालुक्यात बँक कर्ज वितरण मेळाव्याचे व आर्थिक साक्षरता कार्यक्रमाचे अयोजन सोमवार दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजी करण्यात आले होते .
या कर्ज मेळाव्यामध्ये पालघर जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावित यांच्यामार्फत उमेदच्या गटांना कर्ज वाटप करण्यात आले.त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित प्रवीण गवळी सभापती पंचायत समिती डहाणू व पिंटू गहला उपसभापती पंचायत समिती डहाणू त्याचप्रमाणे काशिनाथ दादा चौधरी माजी बांधकाम सभापती जिल्हा परिषद पालघर व लतिका मॅडम झेडपी पालघर सदस्य व पंचायत समिती सदस्य अरुण कदम व शैलेश हाडळ पंचायत समिती सदस्य व श्रीमती स्नेहलता सातवी माजी सभापती पंचायत समिती डहाणू व श्रीमती स्वाती राऊत पंचायत समिती सदस्य डहाणू व श्रीमती सुनिता कांमडी सरपंच कासा व मुकणे सर उपसरपंच कासा व माजी सरपंच त्याचप्रमाणे उमेश गवारी व शैलेश घारपुरे या सर्व मान्यवरांच्या हस्ते 40 गटांना एक कोटी नऊ लाख रुपये वाटप करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापक कक्ष डहाणू तालुका व्यवस्थापक सुनील वाघ तालुका व्यवस्थापक व्यवस्थापक राहील शेख तालुका व्यवस्थापक आर्थिक समावेशन प्रभुदास तुकाराम गावित जिल्हा व्यवस्थापक KM व तालुका व्यवस्थापक SIIB CB यांनी प्रस्तावना व विविध गटांना उपजीविका विषयी मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे प्रभाग समन्वयक दिलवरसिंग वसावे व बँक ऑफ महाराष्ट्र चारोटी नाका बँक मॅनेजर व बँक ऑफ महाराष्ट्र सायवन बँक ऑफ बडोदा वाणगाव व HDFC शाखा डहाणू याच्या मार्फत 40 गटांचे 470 महिला बचत गटांना 1कोटी 10 लाख एवढ्या विक्रमी रक्कमेचे कर्ज वितरण करण्यात आले. बँकेकडून दिल्या जाणाऱ्या कर्जाचा विनियोग महिलांनी गाव स्तरावर विविध सामूहिक व वैयक्तिक व्यवसायासाठी करून आपल्या कुटुंबाच्या उत्पन्नात वाढ करून स्वावलंबी बनावे असे आवाहन यावेळी खासदार राजेंद्र गावित खासदार यांनी उपस्थित महिलांना केले.



