शहर

सफाळे-पालघर राज्यमहामार्ग पाच तासानी सुरु ट्रेलरच्या धडकेने वडाचे झाड कोसळून झाली होती दुर्घटना.सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी बेखबर

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी ट्रेलरमधून वाहतूक करणाऱ्या मशिनरीचा जोरदार धक्का बसून रस्त्याच्या शेजारी असणारे वडाचे भलेमोठे झाड ट्रेलरवर कोसळून सफाळे – केळवे आणि पालघर येथे जाणारा राज्यमहामार्ग वाहतुकीस बंद झाल्याची घटना सोमवारी सकाळी 00.8 वाजण्याच्या सुमारास सफाळे पश्चिमेकडील रामबाग भागात घडली होती . या घटनेनंतर स्थानिक ग्रामपंचायत, सर्पमित्र पिंट्या ग्रुप , पोलीस आदिनी शर्तीचे प्रयत्न करुन सुमारे पाच तासांच्या अथक प्रयत्नांनी रस्ता वाहतुकीस मोकळा केला.

सोमवार दिनांक 29 जुलै 2024 रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास रामबाग भागातून बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी मशिनरी घेवून जाणाऱ्या ट्रेलर चालकाने समोरून येणाऱ्या दुचाकी चालकाला साईड देत असताना वडाच्या झाडाला ट्रेलची धडक बसून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत वडाचे भलेमोठे झाड ट्रेलवर कोसळून दोन्ही मार्गाकडील वाहतूक बंद पडली. या घटनेची माहिती मिळताच माकुणसार ग्रामपंचायतीचे उपसरपंच , भूपेश म्हात्रे स्थानिक गावकरी यांच्यासोबत सफाळे पोलीस, सर्पमित्र पिंट्या मानकर, एलएनटी कंपनीचे कर्मचारी इत्यादिनी शर्तीचे प्रयत्न करुन एक एक करुन झाडाच्या मोठमोठ्या फांद्या छाटून सुमारे पाच तासानी अपघातग्रस्त ट्रेलरला बाजूला करुन रस्ता वाहतुकीस खुला केला आहे .

स्थानिकांनी सदरच्या घटनेची माहिती देवूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी वेळीच धावून न आल्याने स्थानिकांनी मात्र कसलीच पर्वा न करता रस्ता मोकळा करण्यात विशेष मेहनत घेतल्यानेच वाहतूक पूर्ववत झाली. दरम्यान काही महिन्यांपूर्वी याच ठिकाणी ट्रेलरमधून कंटेनर नेत असताना वडाच्या झाडाला अडकून काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. त्यावेळी देखील स्थानिकांनीच पुढाकार घेऊन रस्ता मोकळा केला होता. याच राज्यमहामार्गावर मोठमोठी वृक्ष रस्त्याच्या दिशेने झुकलेली आहेत. दरवर्षी ही वृक्ष उन्मळून किंवा एखाद्या अपघाताने पडून रस्ता बंद पडतो. मात्र दरवर्षी अशा घटना घडूनही सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र कोणतीच उपाययोजना करीत नसल्याने या भागातील नागरिकांकडून प्रशासनाविरुद्ध संताप जनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button