महाराष्ट्र
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श प) अल्पसंख्याक विभागाच्या सोलापूर “जिल्हा संघटक” पदी श्रीपूर चे रशीदभाई मुलाणी…
आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
सोलापूर जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाच्या सोलापूर “जिल्हा संघटक” पदी माळशिरस तालुक्यातील श्रीपुर येथील कट्टर मोहिते पाटील समर्थक असणारे रशीदभाई मुलाणी यांची निवड झाल्याचे पत्र माढा लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचीत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते देण्यात आले…
या वेळी अल्पसंख्याक समाजातील मुख्तारभाई कोरबू,जुबेर दुरुगकर,हमीद मुलाणी,रतनसिंह राजपूत,मुख्तार इन्नुसभाई बागवान,मुबारक नदाफ यांच्या सह बहुसंख्य अल्पसंख्याक कार्यकर्ते उपस्थित होते…
रशीदभाई मुलाणी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकारी पदी निवड झाल्याने त्यांच्यावर सर्वच समाज घटकातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे…