अकलूज जवळ लांडग्यांचा सुळसुळाट,आठ शेळ्या केल्या फस्त…⛔ वन विभागाने केले सतर्क राहण्याचे आवाहन…⛔ ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये भिती चे वातावरण…
टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क माळशिरस तालुका प्रतिनिधी महेश मोहिते .83 80 84 86 73
माळशिरस तालुक्यातील अकलूज नजीक (पाटील वस्ती) येथील शिवराज हंबीरराव माने पाटील यांच्या शेतात शेळ्या चरत असताना लांडग्या च्या कळपाने शेळ्यांवर अचानक हल्ला चढवल्याने शेळ्या जागी ठार झाल्या.मयत झालेल्या शेळ्यांची संख्या आठ इतकी असून त्यातील गाभन शेळी संख्या चार व बोकडे संख्या चार इतकी संख्या आहे.ही घटना घडली असता वन विभाग माळशिरस यांना कळवताच माळशिरस वन विभागाचे अधिकारी पांढरे मॅडम वन शिपाई शेलार यांनी घटनास्थळी भेट दिल्या नंतर ठार झालेल्या शेळ्यांचे पंचनामे करण्यात आले…
वन विभागाच्या पांढरे मॅडम यांनी पाटील वस्ती व इतर भागातील शेतकऱ्यांना हिंसक वन्य प्राण्यांपासून सतर्क राहण्याचा इशारा दिला असून अशी घटना अन्यत्र कुठे घडली तर वन विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करावे असे आवाहन करण्यात आले आहे…
वन विभागाकडून शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानाची भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन हि या वेळी वन विभागाने दिले…
तरी सर्व शेतकरी बांधवांनी इथून पुढे अशी घटना घडल्यास वन विभागाशी संपर्क साधावा व सतर्क हि रहावे असे आवाहन हि वन विभागा कडून कऱण्यात आले…