करकंब येथील व्यापारी उमराह हज यात्रेसाठी सौदी अरेबिया ला रवाना…
आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
करकंब येथील प्रसिद्ध डाळिंब व्यापारी हाजी सादीकभाई बागवान आणि युसुफ हुसेन बागवान हे इस्लाम धर्मातील जगप्रसिद्ध उमराह हज यात्रेसाठी रवाना होणार आहेत अशी माहिती टाइम्स 9 चे अकलूज प्रतिनिधी आमीर मोहोळकर यांनी दिली…
हाजी सादीकभाई बागवान आणि युसुफ हुसेन बागवान यांनी उमराह हज यात्रेसाठी रवाना होण्यापूर्वी करकंब येथे “दुआ” चा कार्यक्रम आयोजित केला होता,त्या कार्यक्रमा प्रसंगी अत्यंत भाऊक क्षणी माढा तालुक्याचे भावी आमदार शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या वतीने उमराह हज यात्रेसाठी जाणाऱ्या दोन्हीं समाज बांधवांचा सत्कार आमीर मोहोळकर यांनी केला,या वेळी सर्व समाज बांधवांच्या उपस्थीती मध्ये “दुआ” चा कार्यक्रम पार पडला…
सदर कार्यक्रमा प्रसंगी अकलूज,पंढरपूर,कुर्डूवाडी,टेंभुर्णी,मोहोळ,सोलापूर येथील सर्व पाहुणे मंडळी हजर होते…