विजयस्तंभाच्या विविध मागण्यांसाठी मंत्रालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चात भीमसैनिकांनी सहभागी व्हावे : उत्तरेश्वर कांबळे
करमाळा प्रतिनिधी : अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
भिमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या विविध मागण्यांसाठी भिमा कोरेगाव ते मुंबई मंत्रालय तसेच मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री यांच्या निवासस्थानावर विजयस्तंभ सेवा समितीचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांच्या नेतृत्वाखालील सन्मान मोर्चा आयोजित करण्यात आला असून यात भीमसैनिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी प्रसार माध्यमातून केले आहे.
हा सन्मान मोर्चा दि.12 सप्टेंबर रोजी निघणार असून जय स्तंभाची तातडीने दुरुस्ती करावी 2018 च्या भिमा कोरेगाव दंगलीतील 30 हजार कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत जयस्तंभ विकास कामासाठी 100 कोंटीची तरतुद करून शौर्यदिनासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करून जयस्तंभ परिसरातील खाजगी जमीन अधिग्रहण करावी जयस्तंभ व छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ यांचा समावेश पुणे दर्शन मध्ये करावा 1971 च्या युध्दातील सैनिकांची काळी पाटी लावण्यात आली असून ती तात्काळ काढून दुसर्या ठिकाणी सन्मानपूर्वक लावण्यात यावी .
जयस्तंभाच्या ठिकाणी येण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशन येथुन स्वतंत्र बस सोडण्यात यावी त्याच बरोबर पार्किंग साठी जयस्तंभाजवळ शासकीय जागेत आरक्षण टाकण्यात यावे आदी प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत..