राज्यात महिला ,मुलींच्या अन्याय- अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ शासन मात्र कुचकामी :उत्तरेश्वर कांबळे
करमाळा प्रतिनिधी: अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
राज्यात महिला व मुलींवर अन्याय अत्याचारांच्या घटना प्रसार माध्यमातून उजेडात येत असून अन्याय अत्याचारांच्या घटनांना आळा घालण्यासाठी व नराधम आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात महायुतीचे सरकार कुचकामी ठरत आहे असा जाहीर आरोप भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे .
अधिक बोलताना कांबळे म्हणाले की बदलापूर येथे दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाला ,कोल्हापूर येथे दहा वर्षांच्या मुलींवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली मंदीरात आसरा घेतलेल्या महिलेवर पुजार्यांनी बलात्कार करून तिची हत्या केली राज्यात छेडछाड, विनयभंग, आणि बलात्कार करुन महिला व मुलींच्या दिवसाढवळ्या हत्या केल्या जात असुन सरकार मात्र चिडीचूप आहे.
कुठ गेले बेटी बचाव बेटी पढाव चा नारा देणारे , शक्ती विधायक कायदा का लागू करण्यात येत नाही. अत्याचार पिडीत कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी ही महाराष्ट्र शासनाने घेऊन असे घटले जलदगती न्यायालयात चालवून नराधम आरोपींना फाशीच शिक्षा दिली पाहिजे असे उत्तरेश्वर कांबळे म्हणाले