शैक्षणिक

जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक चाकोरे या शाळेचा ७५ वर्षेपूर्ती निमित्त अमृत महोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या दिमाखात संपन्न

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

रविवार दिनांक 23 मार्च 2025 रोजी जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा चाकोरे या शाळेचा ७५ वर्षेपूर्ती निमित्त अमृत महोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार उत्तमराव जानकर माजी सभापती शोभाताई साठी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील प्रताप आबा पाटील अजय सकट माजी जि प सदस्या मंगल ताई वाघमोडे विष्णुपंत घाडगे, शामराव बंडगर केंद्रप्रमुख संतोष कोले सरपंच रेश्मा नलवडे उपसरपंच दादासो करडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर भिताडे उपाध्यक्ष नवनाथ पवार उपस्थित होते. 

कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी चाकोरे शाळेतील विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले. यानंतर मुख्याध्यापक श्री बाळासाहेब शिंदे सर यांनी प्रास्ताविक केले तदनंतर भारतीय संस्कृती प्रमाणे अतिथी देवो भव मान्यवरांचा सन्मान शाळा व्यवस्थापन समितीच्या हस्ते करण्यात आला

तदनंतर अमृत महोत्सवा निमित्त अमृतवेल नावाच्या स्मरणिकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर माजी विद्यार्थी व ग्रामस्थ यांचे मनोगत घेण्यात आले विद्यार्थी मेळावा व माजी शिक्षक सन्मान हा या कार्यक्रमाचा मुख्य गाभा होता उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते शाळेमध्ये आजपर्यंत कार्यरत असलेल्या जवळजवळ 46 माजी शिक्षकांचा सन्मान सन्मानचिन्ह, अमृतवेलस्मरणीका व गुलाब पुष्प देऊन करण्यात आला. 

त्याचबरोबर शाळेमध्ये गेले वीस महिने विनावेतन कार्यरत असलेले श्री मा ना क्षीरसागर सर यांचा विशेष सन्मान. सन्मानपत्र देऊन करण्यात आला. त्याचबरोबर ग्रामस्थांच्या वतीने त्यांना 75 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. त्याच्यानंतर कार्यरत शिक्षकांचा ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती यांच्यावतीने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमासाठी जवळजवळ अडीच ते तीन हजार माजी विद्यार्थी विद्यार्थिनी व ग्रामस्थ उपस्थित होते. यानंतर माजी विद्यार्थी ग्रामस्थ व माजी शिक्षक यांची मनोगते झाली पाहुण्यांच्या मनोगतात खासदार मोहिते पाटील यांनी शाळा आणि ग्रामस्थ यांच्या बद्दल गौरव उद्गार काढले. आणि असा कार्यक्रम आज पर्यंत राज्यभर कुठे पाहिला नाही असे उद्गार काढले शाळेसाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासित करून शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थ यांचे कौतुक केले.

तर आमदार जानकर साहेब यांनी समोरचा जनसमुदाय पाहून आपण खूपच भारावून गेलो आणि एखाद्या शाळेचा कार्यक्रम एवढ्या मोठ्या स्वरूपात होऊ शकतो ही अतिशय गौरवाची बाब आहे असे उद्गार काढले. कार्यक्रमासाठी जमा झालेल्या जवळजवळ साडेआठ लाखाच्या निधीबद्दल माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांचे कौतुक केले व शाळेसाठी आमदार फंडातून वीस लाख रुपये चा निधी देण्याचे आश्वासित केले.

यानंतर कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने करण्यात आली संपूर्ण गावालाच स्नेहभोजन देण्यात आले होते. कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, गावातील पदाधिकारी,तरुण मंडळे, सर्व नागरिक, माजी विद्यार्थी या सर्वांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सुहास उरवणे सर व श्री राजाभाऊ गुजर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री कदम सर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button