अकलूज उपजिल्हा रुग्णालयातील परिसेविका सुरेखा केदारी यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर

उपसंपादक—–हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो.9730 867 448
अकलुज येथील उप जिल्हा रुग्णालयातील परिसेविका गुणवंत कर्मचारी पुरस्कार प्राप्त सुरेखा केदारी – सुतार यांना साविञीबाई फुले पुरस्कार जाहीर झाला असुन 8 मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे मा.राज्यमंञी रामदास आठवले याचे हस्ते देण्यात येणार असल्याची माहिती संयोजक यांनी लेखी पत्राने कळवली आहे.
केदारी – सुतार यांना सन 2006 रोजी गुणवंत कर्मचारी हा पुरस्कार देण्यात आला होता .सन 1988 साली आरोग्य खातेत सेवेत रुजू झालेल्या केदारी यानी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये जिल्ह्यात ठीक ठिकाणी आरोग्यसेवेचे काम अत्यंत प्रामाणिकपणे चुल व मुल,प्रपंच सांभाळून केले .प्रत्येक वेळी दवाखान्यात विविध आजाराने पीड़ित असणारे रुग्णाची सेवा केली त्याच्या प्रामाणिक कामचीही पोच पावतीच होय .
प्रत्येक रुग्ण हा औषध गोळ्या पेक्षाही त्याला धीर दिला तर तो लवकर बरा होतो ही केदारी याची मानसिकता सतत असते. त्यामुळे आरोग्य खाते स्थानिक प्रतिनिधी हे नेहमी त्यांचे कौतुक करीत असतात .त्याचे निवडी बाबत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री श् विजयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, अकलुज चे माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील, अकलुज उप जिल्हा रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.



