शहर

डहाणू नगरपरिषद हद्दीतील अनधिकृत बांधकामे जमीन दोस्त

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640.पालघर जिल्हा वृत्तांत

डहाणू नगरपरिषद हद्दीतील शिवाजीनगर ग्रीन झोन मध्ये समाविष्ट असलेल्या आदिवासींच्या भूखंडावर बांधण्यात आलेल्या अनधिकृत घरांवर सोमवारी मुख्याधिकारी वैभव आवारे यांच्या आदेशाने डहाणू पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या पोलीस बंदोबस्तात कारवाई करून ही घरे जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आली आहेत. मुंबईतील एका इसमाने शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर 99 वर्षाच्या करारावर डहाणू नगरपरिषद हद्दीतील शिवाजीनगर सरावली येथे पक्की घरे बांधून विक्री केली होती.

हा संपूर्ण भाग ग्रीन झोन मध्ये येतो तसेच ही अनधिकृत बांधण्यात आलेली घरे आदिवासींच्या मालकीच्या जमिनीवर बांधण्यात आली होती. याबाबत डहाणू नगरपरिषदेने या सर्व घरमालकांना नोटिसा बजावल्या होत्या यावर अंमलबजावणी करत डहाणू नगरपरिषदेने व मुख्याधिकारी वैभव आवारे यांच्या आदेशाने डहाणू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या पोलीस बंदोबस्तात सोमवार दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी या घरांवर कारवाई करून ही सर्व घरे जमीन दोस्त करण्यात आली आहेत तसेच ही जमीन विक्री करणाऱ्या मुंबईतील या इसमावर डहाणू नगरपरिषदे तक्रार दाखल केली असून या इसमावर कडक कारवाई करण्यात येईल असे मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button