शहर
बावडा गावात इंदापूर पोलीसांकडून बेकायदेशीर हातभट्टी दारू धंद्यावर छापा टाकत २ लाख ४९ हजारांचा मुद्देमाल जप्त, चौघा विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

इंदापूर प्रतिनिधी – एस.बी.तांबोळी,
मोबाईल – 8378081147
इंदापूर पोलीसांनी बावडा गावात बेकायदेशीर चालणाऱ्या हातभट्टी दारू धंद्यावर छापा टाकत कारवाई केली आहे. यामध्ये २ लाख ४९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. भारतीय दंड संहिता व महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये चार जणाविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
इंदापूर पोलीस स्टेशन अंकित बावडा दूरक्षेत्र हद्दीतील बावडा येथे बुधवारी एक मार्च रोजी पहाटेच्या सुमारास सदर कारवाई करण्यात आली. इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
सदर पथकाने बावडा परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी अवैध हातभट्टी दारू तयार करणाऱ्या चार जणावर छापा घातला. यात मानवी शरीरास अपायकारक अशा रसायनाने भरलेले तीनशे लिटरचे बॅरल तीन नग, दोनशे लिटरचे १२ नग, शंभर लिटरचा एक नग व इतर साहित्य असे एकूण २ लाख ४९ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. भारतीय दंड संहिता व महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये चौघा जणाविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया इंदापूर पोलीस स्टेशन अंकित बावडा दूरक्षेत्र येथे सुरू आहे.आगामी काळात होळी, ग्रामदैवत यात्रा, जयंती उत्सव व ग्रामपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने इंदापूर पोलीस यांच्याकडून अवैध धंद्यावरती धाडी टाकून धडक कारवाई करण्यात येणार असल्याचे इंदापूरचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी सांगितले आहे.
सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, सहाय्यक फौजदार के. बी. शिंदे, महिला पोलीस हवालदार माधुरी खंडागळे, पोलीस नाईक अमोल गायकवाड, सुनील कदम, आप्पा हेगडे, लखन साळवी, पोलीस शिपाई विकास राखुंडे, विनोद काळे, समाधान केसकर यांनी केली आहे.



