भैरवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.आर.गायकवाड(आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार विजेते) यांचा सेवापुर्ती कार्यक्रम संपन्न.

टेंभुर्णी प्रतिनिधी नानासो चंदनकर मो.नं. (8208530338)
भैरवनाथ विद्यालय आलेगाव बुद्रुक ता.माढा . येथील मुख्याध्यापक मा. श्री.डी.आर.गायकवाड. यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम दिनांक 28/02/2023 या दिवशी आलेगाव बु येथे संपन्न झाला या कार्यक्रमासाठी माढा तालुक्याचे भावी आमदार व व सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन जिल्हा परिषद सदस्य माननीय रणजित भैय्या शिंदे व माननीय शिवाजीराव पाटील जिल्हा परिषद सदस्य तसेच कोंढार भागातील गायकवाड सरांवरती प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते व आजी. माजी. विद्यार्थी उपस्थित होते
या कार्यक्रमात प्रसंगी भैरवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गायकवाड सर यांना अनेक वक्त्यांनी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रम प्रसंगी त्यांनी आयुष्यभर सेवा करण्याचे मनोगत व्यक्त केले इथून पुढच्या उर्वरित आयुष्यामध्ये मी विद्यार्थ्यांचीच सेवा करीन अशा प्रकारचे मनोगत माननीय श्री गायकवाड सर यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचा सहपरिवार आलेगाव बुद्रुक च्या ग्रामस्थांच्या वतीने भव्य आणि दिव्य असा माण सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भैरवनाथ विद्यालयाचे स्टाफ यांनी मोलाचे सहकार्य केले.



