क्रीडा

दि मॉडेल विविधांगी प्रशाला व ज्युनिअर कॉलेज माळीनगर येथे तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न

माळीनगर.. प्रतिनिधी-रियाज मुलाणी मो 9921500780

दि मॉडेल विविधांगी प्रशाला व जुनियर कॉलेज माळीनगर येथे आयोजित केलेल्या माळशिरस तालुकास्तरीय शालेय १४,१७ व १९ वर्षे मुले व मुलींच्या व्हॉलीबॉल स्पर्धा नुकत्याच उत्साहात पार पडल्या.
दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटी संचलित,दि मॉडेल विविधांगी प्रशाला माळीनगर आणि जिल्हा क्रीडा परिषद,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,सोलापूर व पंचायत समिती शिक्षण विभाग माळशिरस यांचे संयुक्त विद्यमाने माळीनगर येथे दि.१ व २ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे संचालक अनिल रासकर यांचे हस्ते व अकलूज बीटचे केंद्रप्रमुख आर.बी.जाधव यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

याप्रसंगी संस्थेचे व्हा.चेअरमन नितीन इनामके,सेक्रेटरी प्रकाश गिरमे,खजिनदार पृथ्वीराज भोंगळे,संचालक दिलीप इनामके,संचालिका ज्योतीताई लांडगे,प्राचार्य प्रकाश चवरे,उपप्राचार्य कलाप्पा बिराजदार,पर्यवेक्षक रितेश पांढरे व क्रीडा विभाग प्रमुख रणजीत लोहार,क्रीडा शिक्षक सिद्धेश्वर कोरे,मारुती आदलिंगे,बाळू चव्हाण,रघुनाथ वाघमारे,संजय पवार,जगन्नाथ कोळी,राजेश कांबळे,सचिन वाघमारे,अमोल राऊत,केतन नकाते,शैलेश माने,बाजीगर शेख व स्पर्धा समितीचे सदस्य तसेच माळशिरस तालुक्यातील क्रीडा शिक्षक यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत क्रीडा मार्गदर्शक रितेश पांढरे यांनी तर सूत्रसंचालन रामहरी वायचळ यांनी केले.या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-१४ वर्षे मुले-गुलमोहर इं.मेडियम स्कुल, माळीनगर (विजयी),स.मा.वी,अकलूज (उपविजयी), १४ वर्षे मुली-स.मा.वी,अकलूज (विजयी),क.बा.पाटील विद्यालय,सदाशिवनगर(उपवीजयी);१७ वर्षे मुले-गुलमोहर इं.मेडियम स्कुल, माळीनगर (विजयी),विष्णुपंत विद्यालय माळशिरस(उपवीजयी),१७ वर्षे मुली-गुलमोहर इं. मेडियम स्कुल, माळीनगर (विजयी),डॉ.बा.ज.दाते प्रशाला, नातेपुते(उपवीजयी);१९ वर्षे मुले- स.मा.वी.अकलूज (विजयी), गो.दे.प्रशाला, माळशिरस(उपवीजयी),१९ वर्षे मुली-स.मा.वी,अकलूज (विजयी),क.बा.पाटील विद्यालय, सदाशिवनगर (उपवीजयी).

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button