दि मॉडेल विविधांगी प्रशाला येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

माळीनगर प्रतिनिधि-रियाज मुलाणी मो.9921500780
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची १३५ वी जयंती दि मॉडेल विविधांगी प्रशाला व ज्युनिअर कॉलेज माळीनगर येथे शिक्षक दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रतिमेचे पूजन प्रशालेचे प्राचार्य प्रकाश चवरे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी पर्यवेक्षक रितेश पांढरे,राजीव देवकर, सुधीर देवळालीकर,रघुनाथ वाघमारे,वसंत पिंगळे, उमेश मुळे,दादा गावडे,बाळासाहेब भोसले, सुनील जवरे,कल्याण कापरे,सिद्धेश्वर कोरे, सविता क्षीरसागर,उमा महामुनी व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रशालेतील विद्यार्थिनी सोनम शिंदे,नीलोफर शेख,श्रद्धा बोरावके,सिद्धी हेगडकर यांनी शिक्षक दिनानिमित्त भाषणे केली. कार्यक्रमाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ सराटी यांचे तर्फे दिला जाणारा नेशन बिल्डर अवॉर्ड चित्रकला शिक्षक संजय माणिक पवार यांना मिळाल्याबद्दल त्यांचा प्राचार्यांच्या हस्ते ट्रॉफी व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला तसेच प्रशालेतील प्रयोगशाळा सहाय्यक राजेश कांबळे यांना महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्यावतीने पुरुषा करिता जेंडर सेन्सिटिव्ह रोल मॉडेल अवॉर्ड मिळाल्याबद्दल त्यांनाही गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षिकेतर कर्मचारी यांना संस्थेच्या व प्रशालेच्या वतीने गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला इयत्ता पाचवी मधील सर्व विद्यार्थ्यांनी “इतिहासाचे रंग रूप हे आले या नगरा ..स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा” हे नृत्यगीत सादर करून सर्वांची वाहवा व बक्षीसे मिळविली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी स्नेहा माळी हिने केले.कार्यक्रम सादर करण्यासाठी जयंती पुण्यतिथी विभागाचे संजय बांदल यांनी परिश्रम घेतले.