पालघर जिल्ह्यातील सफाळे येथील एका महिलेचे फेसबुक अकाउंट हॅक करून अज्ञात इसमाने मित्र मैत्रिणी कडून केली पैशांची उकळ

टाईम्स 9 न्यूज मराठी नेटवर्क
विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640.
फेसबुक वरील अकाउंट हॅक करून त्या महिलेच्या नावे दुसरे फेसबुक अकाउंट ओपन करून तिच्या मित्र मैत्रिणी व नातेवाईकांकडून पैशाची मागणी करून हजारो रुपयांचा गंडा घातल्याची घटना पालघर जिल्ह्यातील सफाळे येथील एका महिलेसोबत घटली आहे.
पालघर जिल्ह्यातील सफाळे पूर्व नंदाडे येथे राहणारी नम्रता राकेश पाटील वय वर्ष 35 हिचे सफाळे देवभूमी येथे लावण्या ब्युटी पार्लर आहे. ती गेल्या अनेक वर्षांपासून सफाळे येथे ब्युटी पार्लरचा व्यवसाय करत असल्यामुळे तिचा अनेक महिला ग्राहकांची तिच्या नावे असलेल्या राणी पाटील या फेसबुक अकाउंट वर चांगला संपर्क आहे.
या संधीचा फायदा घेऊन 25 ऑगस्ट 2023 पासून तिचे फेसबुक वरील अकाउंट अज्ञात इसमानी हॅक करून राणी पाटील नावाने दुसरे अकाउंट ओपन करून राणी पाटील हिचा फोटो प्रथम दर्शनी ठेवून राणी पाटील हिच्या मित्र मैत्रिणींना व नातेवाईकांना हॅक करणाऱ्या अज्ञात इसमाने मी राणी पाटील बोलत आहे असे फेसबुक वर दर्शवून मला पैशांची अत्यंत तातडीने गरज आहे असे खोटे सांगून तिच्या मित्र मैत्रिणी व नातेवाईकांकडून हजारो रुपयांच्या पैशांची उकल केली आहे. याबाबत नम्रता पाटील(उर्फ राणी पाटील) या महिलेने या अज्ञात इसमाविरुद्ध पालघर सायबर गुन्हे विभागामध्ये गुरुवार दिनांक 31 ऑगस्ट 2023 रोजी तक्रार दाखल केली आहे.