डहाणू येथे 7 हजार रुपयांची लाच स्वीकारणारा सुपरवायझर सह खाजगी इसम पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांच्या जाळ्यात अटक

टाईम्स 9 न्यूज मराठी नेटवर्क
विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640
डहाणू तालुक्यात इलेक्ट्रिक पोल वरून टाकलेली नेट ऑप्टिक फायबर केबल पूर्ववत ठेवण्यासाठी 7 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तिचा स्वीकार करणाऱ्या एका सुपरवायझर सह खाजगी इसमाला अँटी करप्शन ब्युरो पालघर युनिट पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांच्या पथकाने सापळा रचून मंगळवारी संध्याकाळी रंगेहात अटक केले आहे.
34 वर्षीय पुरुष तक्रारदार यांचा डहाणू तालुक्यात केबल नेट सर्विस प्रोव्हायडर म्हणून व्यवसाय आहे. ते सर्विस देत असलेल्या डहाणू एम एम आर डी ए च्या आखताऱीतील इलेक्ट्रिक पोल वरून त्यांनी टाकलेली नेट ऑप्टिक फायबर केबल त्याच ठिकाणी पूर्ववत ठेवण्यासाठी अशोक कुमार सूर्यवंश राय वय वर्ष 34 पद सुपरवायझर एसटीसी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मुंबई मूळ रहिवासी बिहार परंतु सध्या राहण्याचे ठिकाण मनोर यांनी मी एम एम आर डी ए चा अधिकारी आहे असे सांगून तक्रारदार (केबल व्यावसायिक) यांच्याकडे 7 हजार रुपयांच्या लाचेची मागणी 5 सप्टेंबर 2023 रोजी केली होती याबाबत तक्रारदार यांनी या अधिकाऱ्याची लेखी तक्रार अँटी करप्शन ब्युरो युनिट पालघर या कार्यालयात केली होती.

या तक्रारीची पडताळणी करून श्री. सुनील लोखंडे पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्र व श्री.अनिल घेरडीकर अप्पर पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली अँटी करप्शन ब्युरो पालघर युनिट पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे, पोलीस निरीक्षक शिरीष चौधरी, पोलीस हवालदार अमित चव्हाण,पोलीस हवालदार संजय सुतार,पोलीस हवालदार दीपक सुमाडा, पोलीस हवालदार विलास भोये, महिला पोलीस हवालदार निशिगंधा मांजरेकर, महिला पोलीस नाईक स्वाती तारवी,
पोलीस शिपाई चालक जितेंद्र गवळी या पथकाने मंगळवार दिनांक 5 सप्टेंबर 2023 रोजी संध्याकाळी 5.20 वाजता सापळा रचून पंचा समक्ष अशोक कुमार सूर्यवंश राय सुपरवायझर यांच्या सांगण्यावरून खाजगी इसम शाहिद सलीम वारसी वय वर्ष 25 राहणार डहाणू चारोटी यांनी तक्रारदार यांच्याकडून लाच स्वीकारून ती अशोक कुमार सूर्यवंशराय यांच्या स्वाधीन केल्यावर लाचेची मागणी करून ती रक्कम स्वीकारली म्हणून या दोघांना रंगेहात अटक करण्यात आले आहे.