दिनांक 6 सप्टेंबर रोजी निघणाऱ्या निषेध मोर्चात पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,माजी आमदार नारायण आबा पाटील यांचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज घटनेचा मी निषेध करत असून करमाळा येथील दिनांक 6 सप्टेंबर रोजी निघणाऱ्या भव्य निषेध मोर्चात पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजर राहावे असे आवाहन माजी आमदार नारायण पाटील यानी केले.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले की, मराठा समाजाला ओबीसी वर्गात आरक्षण दिले जावे, मराठा समाजातील मुला मुलींना शिक्षणात आरक्षणाचा फायदा दिला जावा, कुणबी मराठा म्हणून जातीचे दाखले दिले जावेत आदीसह सकल मराठा समाजाच्या मागणीस आपण आमदार असतानाही पाठींबा दिला होता व आजही आपण या भूमिकेवर ठाम आहोत. यामुळें जालना येथे झालेली घटना निंदनीय असून बेजबाबदार पोलीस अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करावी, आंदोलनातील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यावर व आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे तातडीने मागे घ्यावेत ही आपली मागणी असून मराठा समाजाच्या पाठीमागे आपण भक्कमपणे उभे आहोत.
आगामी काळात या समाजाच्या हिताचा मागण्यासाठी आपला पूर्ण पाठिंबा असल्याचेही माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले. तर राजकीय जोडे बाजूला ठेवून मराठा समाजाच्या उद्या करमाळा येथील निषेध मोर्चा मध्ये पाटील गटाच्या कार्यकत्यांनी सहभागी होऊन जालना येथील घटनेचा निषेध व्यक्त करावा यासाठी गावोगावच्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्याची माहिती पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यानी दिली.