धारदार शस्त्र बाळगणाऱ्या युवकासशस्त्रासह पुसद शहर पोलीसानी केले जेरबंद

प्रतिनिधी मायाताई सागर पाईकराव यवतमाळ
दिनांक ०२/०६/२०२३ रोजीला दुपारी पोलीस उप निरीक्षक शरद लोहकरे सोबत पोहवा प्रफुल इंगोले, पोकॉ शध्दोधन भगत, पो.कॉ आकाश बाभुळकर, असे पोलीस स्टेशन पुसद शहर हदीत पेट्रोलिंग करीत असतांना, माहीती मिळाली की,पुस नदीवरील छोटया हत्ती पुलाजवळ इसम नामे राजु अशांक पंडागळे रा. आंबेडकर वार्ड पुसद हा घातक धारदार शस्त्र बाळगुन आहे,अश्या मिळालेल्या माहीती प्रमाणे मा.पो.नि शंकर पांचळ याना माहीती देवुन त्यानी केलेल्या मार्गदर्शन तथा सुचनेप्रमाणे सदर इसम नामे राजु अशांक पंडागळे वय १९ वर्ष रा.आंबेडकर वार्ड पुसद यांना ताब्यात घेवुन अंगझडती घेतली असतां.त्याचे ताब्यात एका गोणी मध्ये एक लोखंडी तलवार,एक लोखंडी कोयता,एक चाकू स्टीलचे पाते असलेला,एक चाकू स्टीलचे काळे पाते असलेले एकुण चार धारदार घातक शस्त्र बागळगतांना मिळुन आल्याने सदर शस्त्र जप्त करून गुन्हा नोद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. पवन बनसोड साहेब,अप्पर पोलीस अधिक्षक श्री.पियुष जगताप सोहब,सह पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.पंकज अतुलकर साहेब पुसद, पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ,यांचे मार्गदर्शनार्थ डी.बी प्रमुख पोउपनि शरद लोहकरे,पाहेवा प्रफुल इंगोले,पो.ना.दिनेश सांळखे,पोका शुध्दोधन भगत,पो.कॉ आकाश बाभुळकर,पो.कॉ वैजनाथ पवार हे करत आहेत.



