सफाळे रेल्वे पार्किंग मधून रेल्वे कर्मचाऱ्यांची 2 लाख 20 हजार रुपये किमतीची बुलेट मोटरसायकल गेली चोरीला
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640.
पालघर जिल्ह्यातील पश्चिम रेल्वेच्या सफाळे रेल्वे स्थानकातील रेल्वे पार्किंग मधून 2 लाख 20 हजार रुपये किमतीची बुलेट मोटरसायकल चोरी करून अज्ञात चोराने पलायन केले आहे. ही घटना रविवारी रात्री सफाळे रेल्वे पार्किंग हद्दीत घडली आहे.
सफाळे चिखलपाडा येथे राहणारे अवतार रमेश पाटील हे पश्चिम रेल्वेचे कर्मचारी आहेत. ते रविवार दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी रात्री 9:30 वाजता MH-48-BP-2161 ही सिल्वर रंगाची 2 लाख 20 हजार रुपये किमतीची बुलेट मोटरसायकल सफाळे रेल्वे पार्किंग मध्ये पार्क करून ते रात्री 10 वाजता रेल्वे लोकलने मुंबई बांद्रा येथे रात्रपाळीसाठी कामावर गेले होते. ते सोमवार दिनांक 25 डिसेंबर 2023 रोजी सकाळी सफाळे रेल्वे पार्किंग मध्ये परत आल्यावर त्यांची बुलेट मोटर सायकल चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर याबाबत त्यांनी रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.