देश-विदेश

कुस्तीमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल माजी आमदार नारायण आबा पाटील यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान.. निमगाव केतकी येथील ग्रामस्थांनी दिला पुरस्कार

करमाळा प्रतिनिधी

अलीम शेख

मोबाईल नंबर 98 50 68 63 60

कुस्तीमध्ये दिलेल्या योगदनाबद्दल माजी आमदार नारायण पाटील यांना निमगाव (केतकी) ता. इंदापूर येथील ग्रामस्थांकडून जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.जीवन गौरव पुरस्कार सुवर्णयुग गणेश मंदिर ट्रस्ट विश्वस्तांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी मल्ल सम्राट रावसाहेब मगर,  महाराष्ट्र केसरी छोटा रावसाहेब मगर, , रवींद्र माळवदकर,पैलवान उत्तम दादा फरतडे, प्रशांत भागवत, शरद झोळ सर, प्रवीण ठवरे,सुभाष झोळ, ,मच्छिंद्र आप्पा चांदणे, भगवान काका घाडगे, दशरथ आप्पा बनकर,सूर्यकांत महामुनी, वसंत बापू घाडगे,भारत दादा मोरे यांचेसह सुवर्णयुग गणेश मंदिर ट्रस्ट तसेच सुवर्ण योगेश्वर पतसंस्था आणि निमगाव केतकी ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. निमगाव (केतकी) येथील कुस्तीच्या आखाड्यात हा भव्य सोहळा पार पडला. माजी आमदार नारायण पाटील यांनी सन १९८५ ते सन १९८८ या सलग चार वर्षात ७४ किलो वजन गटात महाराष्ट्रात प्रथम येण्याचा विक्रम केला होता. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या या चार अधिवेशनात त्यांनी सलग चार सुवर्ण पदके जिंकली होती. तसेच ७४ किलो वजन गटात ग्रीको रोमन या कुस्ती मधील प्रकारामध्ये त्यांनी राष्ट्रीय सुवर्ण पदक मिळविले होते व देशात प्रथम येण्याची कामगिरी करून दाखवली होती. निमगाव (केतकी) येथील कुस्ती आखाड्यात त्यांनी एक काळ आपल्या कुस्तीमुळे हजारो कुस्ती रसिकांना सर्वोच्च खेळाचे प्रदर्शन करून मंत्रमुग्ध केले होते. या परिसरातील कुस्ती रसिकांचे नारायण पाटील हे आवडते पैलवान आहेत. यामुळेच निमगाव (केतकी) ग्रामस्थांनी माजी आमदार नारायण पाटील यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले.माजी आमदार नारायण पाटील यांनी कुस्ती रसिकांचे आभार व्यक्त केले. आपल्या भावना व्यक्त करताना त्यांनी कुस्तीसाठी आपण सतत योगदान देत राहणार असून पूर्वी एक पैलवान म्हणून प्रत्यक्ष मैदानात खेळ करत योगदान दिले तर आता लोकप्रतिनिधी म्हणून कुस्ती क्षेत्रातील समस्या सोडवून या क्रीडा प्रकाराला आणि कुस्तीगीर यांना राजमान्यता, सन्मान व गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे बोलून दाखवले. यावेळी त्यांचे समवेत महाराष्ट्र केसरी बालारफी शेख तसेच पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर तसेच पैलवान नारायण पाटील कला क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button