महाराष्ट्र

कमी पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात, शासकीय मदत करीत जाहीर करावी,माजी आमदार नारायण आबा पाटील यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी,

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63

कमी पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शासकीय मदत जाहिर करावी अशी मागणी माजी आमदार नारायण पाटील यांनी एका निवेदनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.याबाबत सविस्तर माहिती देताना पाटील यांनी सांगितले की गेली चार महिन्यापासून जूलै महिन्याचा अपवाद वगळता करमाळा मतदार संघात सरासरीपेक्षा खुपच कमी पाऊस झाला आहे. यंदा जून (25 टक्के) व ऑगस्ट (18 टक्के) तर आज अखेर एकुण पावसाच्या केवळ 76 टक्के पाऊसाची नो़द झाली आहे.

पर्जन्यमानात झालेली ही घट चिंतेची असून मागील 20 ते 25 दिवसापासून पावसाने दडी मारल्याने याचा थेट परिणाम हा पिकांच्या उत्पादनावर होणार आहे. पाऊस नसल्याने फुलोरा अवस्थेतील मुग व उडीद आता जळण्याच्या मार्गावर आहे.तूर,मका,बाजरी तसेच यासह कांदा यांची वाढ खुंटली असुन पिक उतपादनावर गंभीर परिणाम होऊन सरासरी 30 टक्के घट दिसून येत आहे. करमाळा तालूक्यात यंदा बाजरी (690  हेक्टर), मका (9120 हेक्टर), तूर (7061 हेक्टर),उडीद (7749 हेक्टर) व मुग (437 हेक्टर) अशी पिक लागवड झाली असून पावसाने ओढ दिल्याने आता ही पिके कमी उत्पादन किंवा जवळपास वाया जाण्याच्या मार्गावर आहेत.

पावसात खंड पडल्याने यातील सरासरी 25 टक्के पिके तर वाया गेली असून एकुण उत्पादनात घट होणार असल्याने शेतकरी शासनाकडून आर्थिक मदतीची अपेक्षा करत आहे.तरी केंद्र सरकारकडून काही विशेष मदतीचे पॅकेज उपलब्ध करुन बळीराजास संकटातून बाहेर काढावे अशी विनंतीवजा मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे केली असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.

तर सन 2014 ते 2019 या कालावधीत कुकडी (19 आवर्तने), जलयुक्त शिवार योजना अंमलबजावणी, दहिगाव उपसा सिंचन योजना  कार्यान्वित करुन माजी आमदार नारायण पाटील यांनी तालूक्यातील सिंचनक्षेत्रात वाढ केली. जिरायत भागातही खरीप व रब्बी हंगामात शेतीसाठी पाणी उपलब्ध करुन दिले.परंतू सन 2019 ऩतर मात्र पेरणीक्षेत्र व सिंचनश्रेत्र घटल्याची आणि उपलब्ध पाणी साठे रिकामे पडल्याची माहिती पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button