शहर

मलेरिया कामगारांचा 15 सप्टेंबर रोजी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा व ठिय्या आंदोलन.

टाईम्स नाईन न्यूज नेटवर्क
उपसंपादक विजय घरत.
भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640.

पालघर जिल्ह्यातील मलेरिया फवारणी कामगार यांना गेल्या तीन वर्षापासून रोजगार नाही एका बाजूला शासकीय व खासगी दवाखान्यात मलेरियाचे रुग्ण सातत्याने सापडत असताना जिल्हा मलेरिया मुक्त दाखवण्यासाठी जिल्ह्यात मलेरियाचे रुग्ण नाहीत अशी खोटी माहिती जिल्ह्यातील अधिकारी वरिष्ठ कार्यालयात पाठवत असतात त्यामुळे काम उपलब्ध होत नाही.
तसेच पालघर जिल्ह्यात आरोग्य विभागात फवारणी व स्वच्छतेची कामे उपलब्ध असून या कामगारांना दोन महिन्यात रोजगार देतो सांगून आज-तगायत रोजगार दिला जात नाही अश्या परिस्थितीत 15 ते 30 वर्षे काम केलेले जिल्ह्यातील फवारणी कामगार आज घरी बसून रोजगाराची वाट पाहत आहेत.

यासाठी आदिवासी एकता मित्र मंडळ सलग्न पालघर जिल्हा मलेरिया फवारणी कामगार संघ 15 सप्टेंबर 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करणार आहेत अशी माहिती आदिवासी एकता मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष जनाठे व अध्यक्ष योगेश भुयाळ यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button