महाराष्ट्र

आमदार संजय मामा शिंदे यांनी कितीही प्रयत्न केले तरी रिटेवाडी उपसा सिंचन योजना माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या हातूनच कार्यान्वित होणार,पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

आमदार संजयमामा शिंदे यांनी कितीही प्रयत्न केले तरी रिटेवाडी उपसा सिंचन योजना माजी आमदार नारायण पाटील यांच्या हातुनच कार्यान्वित होणार असा ठाम विश्वास पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी व्यक्त केला. सध्या माजी आमदार नारायण पाटील यांचेकडून करमाळा मतदार संघातील प्रलंबित कामाबाबत जोरदार पाठपुरावा चालू आहे.

नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेबाबत अधिक स्पष्टपणे बोलताना तळेकर यांनी सांगितले की नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजना ह्या महत्वपूर्ण प्रकल्पाची मुळ संकल्पना माजी आमदार नारायण पाटील यांची आहे.याबाबत शासनदरबारी त्यांनी यापुर्वीही पाठपुरावा केला असून सध्याही त्यांचा पाठपुरावा चालू आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करमाळा मतदार संघातील आदिनाथ कारखान्याच्या गाळप हंगाम शुभारंभ कार्यक्रमात करमाळा तालूक्यातील हजारो शेतकरी उपस्थित असताना माजी आमदार नारायण पाटील यांना नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजने विषयी शब्द दिला असून याबाबत नारायण आबा तुम्ही चिंता करु नका असे सांगून कामाची हमी दिली आहे.

यानंतरच मंत्रालयीन पातळीवर या योजनेस गती मिळत आहे. सध्या विद्यमान आमदार हे या कामाबाबत पाठपुरावा करु लागले असून त्यांनी याकामी मंत्रालयीन पातळीवरील दोन स्वीय सहायक कामाला लावले आहेत. भले या कामाचा पाठपुरावा करण्यासाठी आमदार संजयमामा शिंदे यांनी आणखी इतरजणांना बरोबर घेतले तरी उपयोग होणार नाही. शेवटी हे काम माजी आमदार नारायण पाटील यांच्या हातूनच होणार याची जनतेला खात्री आहे.2019 पुर्वी ज्या प्रस्तावित कामांची नोंद मंत्रालयीन पातळीवर घेतली गेली आहे ती बहुतांश कामे पुर्ण ठरण्यात माजी आमदार नारायण पाटील यांना यश येत आहे.

या कामात नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजना, करमाळा व जेऊर बसस्थानकाचे काम, उपजिल्हा रुग्णालय कर्मचारी निवासी इमारत, तालूक्यातील विविध रस्ते यासह अनेक कामांचा समावेश आसल्याचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button