पूर्व वैमन्यासातून अकलूज येथील गणेश सदाशिव भोसले यांच्यावर प्राणघातक हल्ला.

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
अकलूज येथील गणेश सदाशिव भोसले वय ४० वर्ष ,व्यावसाय शेती राहणार रत्नपुरी नं १८ संग्रामनगर यांच्यावर दिनांक २४/०८/२०२३वार गुरुवार रोजी रात्री ९.३०च्या सुमारास पूर्व वैमन्यासातून प्राणघातक हल्ला झाला असून सध्या त्यांच्यावर अश्विनी हॉस्पिटल अतिदक्षता विभाग संग्रामनगर येथे उपचार चालू आहे.
सविस्तर वृत्त असे की गणेश भोसले दिनांक २४/०८/२०२३वार गुरुवार रोजी कोर्टाचे काम संपवून अकलूज येथे त्यांच्या राहत्या घरी आले व त्यानंतर रात्री ८.३०च्या सुमारास जेवण करून ते पान खाण्यासाठी अशोका चौक येथे आले व पान खाऊन ते घरी जात असताना रत्नपुरी ८ संग्रामनगर ओलांडून रात्री ९.३० च्या सुमारास पाठीमागून एक मोटर सायकल वर ०३ इसम आले त्यांनी गणेश भोसले यांस थांबवले त्यावेळी रस्त्यावरील दिवाबत्तीत व मोटार सायकलच्या दिवाबत्ती उजेडामध्ये त्यांनी पाहिले असता त्यापैकी एक इसम ओळखीचा व दोन अनोळखी व्यक्ती असल्याचे गणेश भोसले यांनी पाहिले त्यांच्या हातात लोखंडी कोयते होते त्यापैकी एकाने तु नाना आसबे खून केस मध्ये लय मस्ती करतोय कोर्टात जातोय, माझ्या वडिलांना जामीन होऊ देत नाही, थांब तुला आता जिवंत सोडत नाही, असे म्हणून त्या इसमाने त्यांच्या हातातील कोयत्याने गणेश भोसले यांच्या डोक्यावर, हातावर, तोंडावर व पायावर ,सपा सप वार करून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांना गंभीर जखमी केले

याप्रकरणी अकलूज पोलिसांनी १० जणांवरती गुन्हा दाखल केला आहे १)प्रवीण उर्फ पंप्पू भोसले २)अतुल उर्फ पिंटू मोहिते ३)साजिद इब्राहिम सय्यद ४)आदित्य मोहिते ५)नितीन एकतपुरे ६)अतुल उर्फ भैया इंगळे ७) नागेश उर्फ गोपी इंगळे ८)रोहित राजू भोसले, सर्व राहणार अकलूज ,तालुका माळशिरस ,व आणखी २ अनोळखी इसम यांच्यासह अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ६१०/२०२४ भारतीय दंड विधान कलम३०७ ,१२० ब ,३४१, ३४ प्रमाणे २५ ऑगस्ट २०२३ रोजी गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास अंमलदार म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी तर तपासी अंमलदार म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार हे करत आहे.



