शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली 2 सप्टेंबर रोजी मुंबई वांद्रे येथे शिवसेना कार्यशाळेचे आयोजन

टाईम्स नाईन न्यूज नेटवर्क
उपसंपादक विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवा सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक दिवसीय कार्यशाळा शनिवार दिनांक 2 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता मुंबई वांद्रे पश्चिम येथील रंग शारदा सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे या एक दिवसीय कार्यशाळेतील शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत या कार्यशाळेला महाराष्ट्र राज्यातील सर्व शिवसेना नेते उपनेते जिल्हाप्रमुख उपजिल्हाप्रमुख तालुकाप्रमुख उपतालुकाप्रमुख जिल्हा संपर्कप्रमुख युवा सेना जिल्हा विस्तारक युवती सेना जिल्हा विस्तारक जिल्हा संघटक जिल्हा समन्वय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे अशी माहिती शिवसेना राज्य मध्यवर्ती कार्यालय यांच्याकडून देण्यात आली आहे.



