महाराष्ट्र

भारतीय जनता पार्टीचे नेते मा.धैर्यशिल भैय्या मोहिते-पाटील यांचा माढा लोकसभा मतदारसंघातील करमाळा तालुक्यातील गावांचा गाव भेट दौरा संपन्न.

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख

भारतीय जनता पार्टीचे नेते मा.धैर्यशिल भैय्या मोहिते-पाटील यांचा माढा लोकसभा मतदारसंघातील करमाळा तालुक्यातील वाशिंबे,राजुरी, सावडी, भराटेवस्ती- सावडी, कोर्टी, विहाळ, वंजारवाडी या गावांचा गावभेट व संवाददौरा संपन्न झाला.

भारत देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी साहेब यांनी राबवलेल्या लोककल्याणकारी योजना व धोरणांची माहीती देत केंद्र सरकार समाजातील शेवटच्या घटकांचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे ग्रामस्थांना सांगितले.

मतदारसंघातील जनतेच्या परिवारातीलच सदस्य असल्या प्रमाणे त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत मा.धैर्यशिल भैय्या मोहिते-पाटील यांनी सांत्वनपर भेटी घेतल्या.

तसेच या गावभेट दौऱ्यांच्या प्रसंगी मा.धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी ग्रामस्थांच्या समवेत संवाद साधला. त्यांच्या अडी-अडचणी प्रश्न जाणून घेतल्या व अगामी काळात देखील भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी वचनबद्ध असल्याचे धैर्यशिल भैय्या मोहिते-पाटील यांनी सांगितले.

याप्रसंगी जि.प.सदस्या सविताराजे भोसले, जिल्हा बँकेचे माजी संचालक भरतरीनाथ अभंग, अजित तळेकर, उदयसिंह मोरे-पाटील, संतोष पाटील, दीपक चव्हाण, अमरजित साळुंके, जगदीश अग्रवाल, नरेंद्र ठाकूर,आबासाहेब टापरे, शाम सिंधी, ज्ञानेश्र्वर खाटमोडे, शिवाजी जाधव आदींसह स्थानीक अनेक मान्यवर पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button