शहर

विरार रेल्वे स्थानकातील महिलेचा अपघात की आत्महत्या

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत

पश्चिम रेल्वेच्या विरार रेल्वे स्थानकात एका 40 वर्षीय महिलेचा अपघात होऊन या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. ही महिला विरार येथील राहणारी होती.

शुक्रवार दिनांक 9 जून 2023 रोजी मुंबई सेंट्रल येथून साडेबारा वाजता अहमदाबाद कडे जाणारी मुंबई अहमदाबाद पॅसेंजर मेल गाडी विरार रेल्वे फलाट क्रमांक 4 वर दुपारी दोन वाजता आली असताना काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट आणि टॉप परिधान केलेली प्रीती मनोहर बुलबुले हिचा या गाडीखाली येऊन अपघात झाला या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला आहे.

याआधीही महिला मालाड येथे राहत होती. सध्या तिचे वास्तव्य विरार येथे होते. विरार लोहमार्ग पोलिसांनी या महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन या महिलेचा अपघात झाला की या महिलेने आत्महत्या केली आहे याबाबत विरार रेल्वे लोहमार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button