जनसेवा रिक्षा स्टॉप नाम फलक अनावरण सोहळा संपन्न

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालय प्रवेश द्वारा लगत टाइम्स 9 मराठी न्यूज चैनलचे सौजन्य लाभलेल्या जनसेवा रिक्षा स्टॉप नाम फलकाचा अनावरण सोहळा ज्येष्ठ पत्रकार तथा अकलूज वैभव चे संस्थापक संपादक भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांच्या हस्ते फित कापून संपन्न झाला.

या कार्यक्रम समारंभाच्या अध्यक्षस्थानी रिक्षा चालक-मालक जनसेवा संघटनेचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड होते.

याप्रसंगी टाइम्स 9 मराठी न्यूज चॅनेल चे संस्थापक संपादक नौशाद शमशुद्दीन मुलाणी,टाइम्स 9 मराठी चे माळीनगर प्रतिनिधी रियाज निजामभाई मुलाणी, रिक्षा स्टॉप चे शाखा अध्यक्ष संतोष महादेव कोंढारे, उपाध्यक्ष नाजिम पापाभाई सय्यद, कार्याध्यक्ष कुमार भाऊसाहेब चव्हाण,

सचिव मौलाशाह शहंशाह मकानदार, सहसचिव रमजान इकबाल तांबोळी, खजिनदार अमीर महंम्मद मुलाणी, यांच्यासह सलीम कादर शेख, इम्रान जब्बार बागवान, शौकत रहिमान सय्यद,सादिक रहीम खान ,सुरेश आप्पा चव्हाण, हारून इब्राहिम बागवान, शौकत मजीद सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.



