आसिफ घाची यांच्या कुटुंबीयांना पालघर माजी शिवसेना जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे यांच्याकडून आर्थिक मदतीचा हात.

टाईम्स नाईन न्यूज मराठी नेटवर्क उपसंपादक विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत.
पालघर जिल्ह्यातील आसिफ घाची या 28 वर्षीय रिक्षाचालकाची 12 ऑगस्ट 2023 रोजी मोखाडा मोरचुंडी येथे तीन अज्ञात आरोपींनी हत्या केली होती.
यापैकी दोन आरोपींना जेरबंद करण्यात पालघर पोलिसांना यश आले असून ही यशस्वी कारवाई पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज शिरसाठ, तसेच पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती नीता पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते, पालघर पोलीस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मंजुषा शिरसाठ, पोलीस नाईक सुयोग कांबळे या पथकाने पार पाडली आहे.
आसिफ घाची या 28 वर्षीय रिक्षा चालकाच्या हत्येमुळे त्यांच्या कुटुंबीयावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून व त्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात म्हणून आसिफ घाची यांच्या कुटुंबीयांना भेट देऊन पालघर माजी शिवसेना जिल्हाप्रमुख व पालघर नगराध्यक्ष उत्तम पिंपळे यांनी त्यांच्या कुटुंबीयांना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे.



