महाराष्ट्र

तुम्ही टेंभीखोडावे-सफाळे रस्त्याने प्रवास करता का.? मग सावधान तुमचा जीव धोक्यात आहे.

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक – 7030516640 पालघर जिल्हा वृत्तांत

पालघर जिल्ह्यातील विटी-लाईन म्हणजे टेंभीखोडावे सफाळे या रस्त्याने तुम्ही प्रवास करता का ? मग सावधान रहा.. तुमचा जीव धोक्यात आहे. कारण या रस्त्यावर भर दिवसा आणि रात्रीच्या अंधारात अवैधरित्या उत्खनन केलेल्या रेतीच्या मालाने भरलेले पिकअपट्रक बेशुट भरधाव वेगाने चालवण्याची सध्या स्पर्धा चालू आहे. रेतीने भरलेल्या या पिकअप ट्रकचे अल्पवयीन चालक विनापरवाना लायसन्स नसताना देखील चिखलपाडा या भागातून अवैधरित्या उत्खनन केलेल्या रेतीची वाहतूक करून विक्री करत आहेत.

ही वाहतूक करताना गावातील नागरिकांनी आपल्याला पकडू नये या भीतीने हे वाहन चालक या रस्त्यावर भरधाव वाहतूक करून रात्री आणि दिवसा जास्तीत जास्त फेऱ्या मारून पैसे कमावण्याच्या नादात ही अवैद्य वाहतूक करून नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळत आहेत . संपूर्ण पालघर जिल्ह्यात रेती उत्खननावर महाराष्ट्र शासनाने बंदी लागू केली असताना देखील चिखलपाडा या गावातील समुद्रकिनारी राज-रोज पणे प्रशासनाच्या नियमांची पायमल्ली करून हजारो ब्रास रेती उत्खनन करून तिची खुलेआमपणे विक्री केली जात आहे.

ही वाहतूक करताना हे वाहतूकदार भरधाव वेगाने पिकअपट्रक चालवत असल्यामुळे या रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले असून दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी मांजुर्ली-मांडे या बस स्टॉप वर एका अज्ञात पिकअप वाल्याने रात्री 3.30 वाजता जलसार किरईपाडा या गावातील (44 वर्षीय)अनिल गावड या रिक्षावाल्याला मागून ठोकर देऊन हा अज्ञात पिकअपट्रक वाला फरार झाला आहे. त्याचा पोलीस कसून शोध घेत आहे.सध्या या रिक्षावाल्याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर पालघर येथील रिलीफ या खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button