महाराष्ट्र

कृष्णानंद परिवारात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

अकलूज शिक्षण प्रसारक मंडळ,अकलूज संचलित कृष्णानंद विद्यामंदिर, पाटीलवस्ती येथे स्वतंत्र भारताचा ७७ वा स्वातंत्र्य दिन जोशपूर्ण आणि उत्साहात संपन्न झाला.

सर्वप्रथम आलेल्या मान्यवरांना औक्षण करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजित प्रमुख पाहुणे मा. श्री. वसंत पांडुरंग जाधव साहेब, संचालक, शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज यांचे हस्ते तसेच स्थानिक व्यवस्थापन समितीतील सभापती व सर्व सदस्य व मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन राष्ट्रगीत, राज्यगीत, व ध्वजगीत गायन करण्यात आले. नंतर विद्यालयातील स्काऊट व गर्लगाईड या दोन्ही ट्र्पचे घोषपथकाच्या तालावर अतिशय शानदार संचलनाला प्रमुख पाहुणे मा. श्री. जाधव साहेब यांनी मानवंदना स्वीकारली. या दोन्ही ट्र्पला सौ. मोरे मॅडम व श्री. गुरव सर व श्री. सय्यद सर यांनी सराव व मार्गदर्शन केले. यानंतर घोषपथकाच्या तालावर अतिशय तालबद्ध कवायतीचे बिनचूक सादरीकरण करण्यात आले.

तसेच आरोग्याची गुरुकिल्ली असलेल्या सूर्यनमस्कार, व आसने याचे अतिशय उत्तम सादरीकरण विद्यार्थ्यांनी करून दाखविले, त्यांना सहशिक्षक व प्रमुख श्री. ढोले सर व सहाय्यक श्री. अनगळ सर यांनी मार्गदर्शन केले. यानंतर भारत देश हा अनेक वेषभूषा, अनेक भाषा, धर्म व पंथ असूनही एकतेचे प्रतिक असणारा देश आहे. येथे सर्वजण गुण्यागोविंदाने राहतात व भारतमातेचे स्वागत करणारे हे सांगणारे देशभक्तीपर, ५० विद्यार्थ्यांचे, एकतेचा संदेश देणारे कृतीगीत सादर झाले. यासाठी नृत्य दिग्दर्शक म्हणून श्री. आठवले सर, व मेकअप साठी कु. चेमटे मॅडम, कु.पठाण मॅडम , सौ.देशमुख मॅडम यांनी सहाय्य केले. नंतर प्राथमिक विभागातील कु. श्रुतिका पांडोळे व कु जान्हवी माने (इ. ३री )तर माध्यमिक विभागातील कु. यशोदा गायकवाड(इ.७ वी ), कु. प्रतीक्षा घुले ( इ.७ वी) , कु. श्रावणी चव्हाण (इ. ५ वी) यांनी जोशपूर्ण भाषणातून स्वातंत्राची गाथा मांडली.

शेवटी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री जाधव साहेब यांनी आपल्या संदेशातून विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यपासून ते आजची परिस्थिती सांगितली. व त्यासाठी विद्यार्थ्यांनी ताणतणाव विरहित शिक्षण व विविध परीक्षा यांची तयारी करावी. तसेच विद्यार्थ्यांनी कौशल्यधिष्ठित शिक्षणावर भर द्यावा व आपले भविष्य उज्वल करावे. शेवटी “सारे जहाँ से अच्छा…” या गीताने कार्यक्रमाची सांगता केली, विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाचा शेवट गोड केला.

स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक श्री. प्रताप तोरणे, श्री. भानुदास आसबे, पर्यवेक्षक श्री. दगडे, श्री. शेटे सर, श्री.जगताप सर, श्री. चव्हाण सर, व सौ. थोरात मॅडम सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक श्री संतोष अनगळ व सहशिक्षिका कु धाइंजे मॅडम यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button