महाराष्ट्र

15 ऑगस्ट 2023 मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला…!70000 रु देणगी देऊन वकिलांनी आदर्श निर्माण केला..!

चांदापुरी प्रतिनीधी रशिद शेख

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला व ज्यू कॉलेज चांदापुरी (ता.माळशिरस सोलापूर) येथे उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला यावेळी ऍड धनंजय बाबर यांच्या हस्ते झेंडावंदन करून मानवंदना देण्यात आली.

विद्यार्थ्यांनी चांदापुरी गावातुन रॅली काढून प्राचार्य यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केली. मुले व मुली यांनी देशभक्तीपर गीते,भाषणे व भारत माता की जय म्हणून परिसर दुमदुमून सोडला होता.वर्षाराणी जाडकर,मिसाळ,अक्षरा लोंढे,प्रेरणा देठे,अमृता तुपे इ नी उत्कृष्ट भाषणे केली.

दहावी ब बारावी (आर्ट,सायन्स, कॉमर्स) 2022-23 मध्ये नंबर मिळालेल्या विद्यार्थ्यांचा तसेच NMMS विद्यार्थी व गव्हरमेन्ट कॉलेजला सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांचा कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍड धनंजय बाबर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तर प्रशालेस 70000 रु देणगी दिल्याने ऍड बाबर यांचा विशेष सत्कार गारवाड विकास सोसायटीचे संचालक आनंदा लोंढे व शाळा समिती जितेंद्र देठे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी मनोगत पर भाषणात संस्थेचे अध्यक्ष डॉ.कुमार लोंढे,प्राचार्य के साठे,विशेष अतिथी बाळासो गायकवाड( ता.अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा) ,शाळा समिती सभापती बाळासो जाडकर,शाळा समिती अध्यक्ष कांबळे इ नी मनोगत व्यक्त केले

कार्यक्रमास संस्थेच्या सचिव डॉ.पंचशीला लोंढे,युवा उद्योजक भैय्या बाबर,जितेंद्र देठे,लक्ष्मण साठे,अशोक मारकड,शिंदे,बापू सुळ,समाधान खरात,अंकुश लोंढे,रणजित सरतापे इ मान्यवर उपस्थित होते.प्रा.अल्ताफ पठाण,प्रा.कारंडे,प्रा.देवकाते,काळे मॅडम,अरुणा लोंढे मॅडम इ स्टाफ ने विशेष परिश्रम घेतले.प्रास्तविक प्राचार्य के साठे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.राजेश वायदंडे यांनी केले शेवट आभार क्लार्क आकाश सरतापे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button