महाराष्ट्र

स्वातंत्र्यदिनानिमित्त माळीनगर येथे वृक्षारोपण.

माळीनगर प्रतिनिधी… रियाज मुलाणी मो.9921500780

माळीनगर येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित रत्नाई कृषी महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम २०२३-२४ अंतर्गत स्वातंत्र्यदिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.

अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्राम सिंह मोहिते पाटील रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर. जी. नलावडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. एस.एम एकतपुरे, प्रोग्राम ऑफिसर प्रा. एम. एम. चंदनकर आणि प्रा. एच. व्ही. कल्याणी यांच्या मार्गदर्शनानुसार कृषिदूत भाग्यश्री कदम, आकांक्षा मोरे, लक्ष्मी कोरे, , रोहिणी गोलेकर, अंकिता भोगवडे, प्रणाली देशमुख, मेघना मोरे, प्रशाली पवार, श्वेता भडंगे यांनी आंबा, चिंच, सिताफळ, चिकु या झाडाची वृक्षारोपण केले. यावेळी कृषीसहायक, ग्रामसेवक,कृषिदूत व माळीनगर मधील ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमात कृषिदुतांनी वृक्षरोपणाची गरज व त्याचे फायदे व वृक्षसंवर्धन कसे करावे या विषयी मार्गदर्शन केले व यापुढील कार्यक्रमांमध्ये अश्याचप्रकारे वृक्षरोपण करून निसर्गाचे संतुलन कसे ठेवता येईल याबद्दल माहिती दिली व ” झाडे लावा झाडे जगवा ” असा प्रण घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button