सोलापूर जिल्हा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या महाआरोग्य शिबिराचे आयोजन जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घेण्याचे केले आवाहन

करमाळा प्रतिनिधी
अलीम शेख
मोबाईल नंबर 98 50 68 63 60
शिवसेना (शिंदे गट )सोलापूर जिल्हा प्रमुख श्री महेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार दिनांक 7 मार्च रोजी भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य शिबिराचे उद्घाटन सोलापूरचे खासदार मा. ना श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार असून सदर आरोग्य शिबिरासाठी मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी तथा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे कक्ष प्रमुख श्री मंगेश चिवटे उपस्थित राहणार आहेत. सदर आरोग्य तपासणी शिबिरामध्ये मोफत नेत्र रोग , मोफत चष्मा वाटप, मोफत औषधी वाटप तसेच हृदयरोग तपासणी व ईसीजी, लहान मुले, हाडांची ठिसूळता व यूरिक ॲसिड, बीपी व शुगर, ऑर्थोपेडिक इत्यादी तपासण्या होणार असून सर्व तपासण्या ह्या तज्ञ डॉक्टरांकडून होणार आहेत. सदर आरोग्य शिबिरासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि सुश्रुत हॉस्पिटल बार्शी, साई संजीवनी हॉस्पिटल बार्शी, सुविधा हॉस्पिटल बार्शी, नर्गिस दत्त हॉस्पिटल बार्शी, नवजीवन चिल्ड्रन हॉस्पिटल पंढरपूर, सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर, उपजिल्हा रुग्णालय करमाळा, ग्रामीण रुग्णालय जीवन, इत्यादी नामांकित रुग्णालयांच्या सहकार्यातून पार पडणार आहे. तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्याकडून करण्यात येत आहे.



