महाराष्ट्र

बौद्धिक प्रदुषण कमी करा – लक्ष्मण गुणवरे

अकलूज प्रतिनिधी तात्यासाहेब काटकर

अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयात इयत्ता बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थांसाठी गणित विषयासंदर्भात विद्यालयाचे प्राचार्य अमोल फुले यांच्या मार्गदर्शनाखाली बौद्धिक प्रदूषण व उपाय यावर तज्ञ मार्गदर्शक लक्ष्मण गुणवरे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात कल्पना जाधव मॅडम यांनी अभ्यासक्रमात आणि समाज जीवनात गणिताचे महत्व सांगीतले.

तसेच विद्यालयाचे उपप्राचार्य संजय शिंदे यांनी तज्ञ व्याख्याते गुणवरे यांची ओळख करून दिली. गुणवरे हे शाळेचे माजी विद्यार्थी असून विद्यार्थ्यांना गणित विषय सोपा जावा व त्यांनी तयार केलेली साहित्यीक बुद्धीमत्ता पुस्तिका विषयी माहिती सांगितली. व आपल्या भाषणात शुश्रूषा (सेवा), श्रवण, ग्रहण, धारण, चिंतन, उहापोह, अर्थ विज्ञान, आणि तत्त्वज्ञान – हे बुद्धि चे गुण आहेत. आपलं वय कीतीही असू द्या. तरीही आजचं युग असं आहे की आपण मानसिकदृष्ट्या तसेच बौद्धीकदृष्ट्या सुद्धा निरोगी राहणे खूप महत्वाचे आहे. म्हणूनच आयुष्यात काही गोष्टींमध्ये यश मिळवण्यासाठी शरीरासह आपली बुद्धी तंदुरुस्त ठेवा असे आवाहन केले.

गुणवरे यांनी माणसाच्या आयुष्यात गणिताचे अनन्यसाधारण महत्त्व सांगितले. आजच्या या आधुनिक जगात आपण मेंदूला ताण देण्यास तयार नाही. ज्याप्रमाणे ध्वनी, अन्न, हवा, पाणी प्रदूषण वाढत आहे त्याच्या दुप्पट तिप्पट बौद्धिक प्रदूषण वाढत आहे. गणिताच्या भाषेत सांगायचे झाल्यास गणितीक्रिया करताना बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार यासाठी आज कॅल्क्युलेटर चा वापर केला जात आहे. यामुळे बुद्धीची वाढ थांबते. ज्याप्रमाणे शरीराला व्यायामाची गरज असते त्याचप्रमाणे बुद्धीला ही व्यायामाची गरज असते. अशी माहिती देऊन विद्यार्थ्यांना गणितातील कोडी, प्रश्न देऊन बोलते केले. याप्रसंगी पत्रकार नायकुडे साहेब, प्राजक्ता जाधव मॅडम, विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी डॉ योगिता सोनार यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button