पालघर जिल्ह्यातील केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीत सापडला बेवारस पुरुष जातीचा मृतदेह.

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत
पालघर जिल्ह्यातील केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील वाढीव गावाशेजारी असलेल्या समुद्रकिनारी एका पुरुष जातीच्या इसमाचा मुतदेह केळवा सागरी पोलिसांच्या हाती शुक्रवार दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी सापडला आहे.
हा पुरुष जातीचा मृतदेह असून अंदाजे वय वर्ष 38, उंची 5 फूट 6 इंच अंगाने मजबूत नेसणीस निळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट, अंगात निळ्या रंगाचा गोल गळ्याचा टी-शर्ट त्यावर छातीवर डाव्या बाजूस MARO 93 असे लिहिले आहे. तसेच पायात राखाडी सॅंडल आहेत असा वेश परिधान केलेला आहे.
सदर व्यक्तीच्या चेहऱ्यावरील नाकाचा व तोंडाचा व एका डोळ्याचा भाग समुद्री माशांनी कृतडल्यामुळे त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नसून सदर व्यक्ती बाबत काही एक गोपनीय माहिती प्राप्त असल्यास केळवा सागरी पोलीस ठाणे 7977020479 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केळवा सागरी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड, आणि पोलीस उपनिरीक्षक पवार यांच्याकडून नागरिकांना करण्यात आले आहे.



