महाराष्ट्र

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्ता स्थापनेसाठी पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा – प्रदेशाध्यक्ष ईद्रीसभाई मुलतानी

इंदापूर प्रतिनिधी एस. बी. तांबोळी,
मोबाईल – 8378081147

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्ता स्थापनेसाठी पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन भाजपा अल्पसंख्यांक विभागाचे नुतन प्रदेशाध्यक्ष ईद्रीसभाई मुलतानी यांनी केले.

पुणे येथे भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक विभागाच्या पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी व कार्यकर्त्यां बरोबर संघटनात्मक संवाद बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रदेश महामंत्री अतिक खान, सलीम जहांगीर, मुंबई अध्यक्ष वसिम खान, अन्वर भाई, मुन्नवर पटेल, सलीम बागवान, अश्रफ वानकर, सोलापूर जिल्हाध्यक्ष मुख्तारभाई कोरबू, उपाध्यक्ष सलीम बागवान, माळशिरस तालूकाध्यक्ष रशिद मुलाणी, इंदापूर तालूका उपाध्यक्ष मुजमीर तांबोळी आदिंसह महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे राज्यात विभागवार दौरे काढून मेळावा व पदाधिकारी यांच्या बैठकांचे आयोजन केले जात आहे. पुणे येथील कार्यालयात सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच प्रत्येक तालुक्यातील अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button