माढा विधानसभा चे भावी आमदार शिवतेजसिंह मोहिते पाटील…युवकांमध्ये जबरदस्त क्रेझ असलेलं विकासप्रिय नेतृत्व म्हणजे शिवतेजसिंह मोहिते पाटील…

आमीर मोहोळकर अकलूज शहर प्रतिनिधी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मोबाइल नंबर 9890299499
मित्रांनो,महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार आहे आणि आज च्या घडीला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व बाबतीत सध्या तरी आघाडी घेतली असुन कोणत्याही परिस्थिती मध्ये जास्तीत जास्त जागा ह्या महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श प) गट मिळवणारच असा “पण”च दस्तुरखुद्द शरद पवार यांनी घेतला आहे की काय असे आज तरी ठळकपणे दिसत आहे,कारण चाणाक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीतच महाराष्ट्राच्या विधानसभेची उजळणी केलेली असेल यात मात्र शंका आणण्याचे कारण नाही…
महाराष्ट्राच्या 288 विधानसभा मतदार संघा करीता ज्या वेळी निवडणुक जाहीर होईल नेमक्या त्याच वेळेपर्यंत शरद पवार यांनी आपल्या पक्षासाठी जवळ जवळ 70 ते 75 जागा ह्या कशा प्रकारे विजयी होतील याचे गणित देखील करुन च ठेवलेले असणार आहे…

लोकसभा निवडणुकीत जसे माढा लोकसभा मतदार संघाने अख्ख्या देशाचे लक्ष वेधून घेतले होते अगदी त्याच प्रमाणे माढा विधानसभा हि त्याच धर्तीवर लक्ष वेधून घेइल असे सध्या तरी दिसत आहे कारण लोकसभा निवडणुकी मध्ये “अजातशत्रू” विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्त्वात घेतलेला निर्णय शिरसावंद्य मानत महाविकास आघाडी चे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचाराची सबंध माढा विधानसभा क्षेत्राची जबाबदारी यशस्वी पणे पार पाडणारे शिवतेजसिंह मोहिते पाटील हेच खरे दावेदार असणे आता स्वाभाविक मानले जात आहे…
माढा विधानसभा क्षेत्रात माढा तालुक्यातील गावे,पंढरपूर तालुक्यातील काही गावे आणि माळशिरस तालुक्यातील काही गावांचा समावेश असल्याने शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या नावाचा विचार आता जनता च करू लागली आहे,एक तर शिवतेजसिंह मोहिते पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आणि त्यांनी आज पर्यंतच्या आपल्या राजकीय जीवनामध्ये केलेले कार्य हया त्यांच्या जमेच्या बाजू असणार आहेत आणि तिसरे म्हणजे या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पिंजून काढलेला अख्खा माढा विधानसभा मतदार संघ आणि यातूनच त्यांनी मिळवलेले जीवाभावाचे कार्यकर्ते हि सुध्दा शिवतेजसिंह मोहिते पाटील यांची जमेची बाजू असणार आहे…

तसे पहायला गेलं तर माढा विधानसभा क्षेत्रातील जनतेने गेली तीस वर्षे एकाच आमदाराला निवडून देउन हि माढा तालुक्याचा विकास म्हणावा तसा झालेलाच नाही आत्ताच्या स्थानिक आमदाराने जनतेचा नुसता भ्रमनिरास केल्याने माढा तालुक्याचा विकास खुंटला असुन स्थानिक आमदाराने मात्र आपल्या स्वकियांचा विकास केल्याने जनतेमध्ये त्यांच्या बद्दल तीव्र नाराजी पसरलेली आहे हे हि ध्यानात घेण्यासारखे आहे…
माढा तालुक्याचे आमदार बबनराव शिंदे ह्यांनी देखील अजित पवार यांच्या सोबती मुळे फुले शाहु आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांना तिलांजली देत भाजपा सारख्या जातीवादी पक्षाच्या सावलीला गेल्याने माढा तालुक्यांतील जनता त्यांच्यावर हि नाराज असल्याचे आपण सर्वांनी लोकसभा निवडणुकीत पाहिलेच आहे…
धैर्यशील मोहिते पाटील यांच्या लोकसभा निवडणुकी मध्ये शरद पवार हे बारीक लक्ष ठेवून होते,शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या सारखा एक उमदा तरुण दिलेली जबाबदारी कशी पार पाडत आहे हे शरद पवार यांनी जवळून पाहिल्याने भविष्यात माढा विधानसभा लढवण्याची आणि ती जिंकुन आणण्याची जबाबदारी हि शरद पवार हे शिवतेजसिंह मोहिते पाटील यांना देतील असे हि जनतेतून बोलले जात आहे,कारण की सोलापूर जिल्हयातील युवकांचा बुलंद आवाज म्हणुन हि शिवतेजसिंह मोहिते पाटील यांची उमेदवारी पुढे येऊ लागल्याने माढा विधान सभा हि कसल्याही परिस्थितीत लढ्वतील असा राजकीय तज्ञांचा होरा आहे…
ज्या वेळी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा होईल त्या वेळेपर्यंत माढा विधानसभा चे भावी आमदार म्हणून शिवतेजसिंह मोहिते पाटील यांना सर्वानुमते उमेदवारी द्यावीच लागेल असे चित्र निर्माण होताना सध्या तरी दिसत आहे…
भविष्यात कशाही प्रकारच्या राजकीय घडामोडीं घडल्या तरी माढा विधानसभा मतदार संघातील जनतेचा आमदार म्हणून शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या नावाला जनता प्राधान्य देत त्यांच्या उमेदवारीची मागणी करेल आणि चाणाक्ष शरद पवार साहेब ती मागणी पुर्ण हि करतील असे युवा वर्गातून ऐकण्यास ऐकण्यास मिळत आहे…
बारामती,सातारा,अ नगर आणि माढा लोकसभा मतदार संघासह शरद पवार यांच्या पक्षाच्या सात जागा तरी या वेळी निश्चित येतील असा राजकीय तज्ञांचा अंदाज असल्या कारणाने आणि शरद पवार यांना महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयाची चाहूल लागल्यानेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपल्या पक्षाचे उमेदवार जास्त जागेवर उभा करण्याचे सूतोवाच देखील केले आहे…



