शैक्षणिक

कुंभेजच्या बागल विद्यालयाचे एस एस सी परीक्षेत उज्वल यश. विद्यालयाचा 97.95% लागला निकाल

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

महाराष्ट्र शासनाच्या नुकतेच झालेल्या मुख्यमंत्री सुंदर शाळा स्पर्धेत बागल विद्यालयाने प्रथम क्रमांकाचे पारितोषीक मिळवले आहे. सहशालेय विविध उपक्रमांत ऊत्तुंग यश मिळवत असताना गुणवत्तेतही विद्यालयाने यशाची परंपरा अखंडित ठेवली आहे. मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या बोर्ड परीक्षेत कुंभेज येथील दिगंबरराव बागल माध्य. विद्यालयाचा एकूण निकाल 97.95 टक्के लागला असून प्रथम तीन गुणवंतांमध्ये मुलींनीच बाजी मारल्याचे दिसून आले. तृप्ती भारत सातव ही 91.60 % गुण प्रात करत विद्यालयात प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. पल्लवी कुमार कादगे हीने 88.20% गुणांसह द्वितीय क्रमांक पटकावला.

तर समृध्दी सोमनाथ शिंदे हीने 83.60 % गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला. परीक्षेसाठी एकूण प्रविष्ट झालेल्या49 पैकी 48 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये 17 विद्यार्थ्यांनी बिशेष प्राविण्य मिळवले. 16 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवली तर 14 विद्यार्थी द्बितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.

उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखल्याबद्दल संस्थाध्यक्षा तथा करमाळ्याचे मा. आमदार शामलताई बागल (मामीसाहेब ), संस्थेच्या सचिवा मा.रश्मी दिदिसाहेब बागल, मार्गदर्शक युवा नेते मा. चेअरमन दिग्वीजय भैय्यासाहेब बागल यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व गुणवत्तेसाठी प्रयत्नशील असणारे मुख्याध्यापक श्री.हनुमंत पाटील यांचे विशेष अभिनंदन केले तसेच मार्गदर्शक शिक्षक कल्याणराव साळुंके, सिताराम बनसोडे, संतोष शिंदे, विष्णू पोळ, यांचेही अभिनंदन केले. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहकार्याबट्दल मान्यवरांनी कुंभेज ब पोफळज ग्रामस्थांचे धन्यवाद व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button